महाराष्ट्रात पुन्हा येऊ शकते भाजप-शिवसेनेचे सरकार, या नेत्याने दिला नवा फॉर्म्युला

महाराष्ट्रात पुन्हा येऊ शकते भाजप-शिवसेनेचे सरकार, या नेत्याने दिला नवा फॉर्म्युला

महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकते. खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या संदर्भात नवा फॉर्म्युलाही दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,12 डिसेंबर: महराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपला सरकार स्थापन करता आली नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यांना अवघ्या 3 दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

आता राज्यसभेचे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक दावा केला आहे. तो म्हणजे, महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकते. खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या संदर्भात नवा फॉर्म्युलाही दिला आहे.

काय आहे फॉर्म्युला?

राज्यसभेत बुधवारी रात्री उशीरा नागरिकत्व विधेयकावर शिक्कामोर्तब झाला. नागरिकत्व विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेला ऐतिहासिक क्षण असे संबोधले. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्वीट केले आहे. शिवसेनेने अजून हिंदुत्वाची विचारधारा सोडलेली नाही, ही चांगली बाब आहे. नागरिकत्व विधेयकाविरोधात शिवसेने मत दिले नाही. भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकदा चर्चा सुरू करण्याची हिच योग्य वेळ आहे. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेऊ शकते.

दरम्यान, शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. परंतु, बुधवारी राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांनी मतदानाच्या आधीच वॉकआउट केले होते. या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत शिवसेनेवर कडाडून टीका केली होती. सत्तेसाठी लोक केव्हा कसा रंग बदलतात, असे अमित शहा यांनी म्हटले होते. शिवसेनेने एका रात्रीत आपली भूमिका का बदलली, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे, असेही अमित शहा यांनी सांगितले.

शिवसेनेवर दबाव..

शिवसेनेने काँग्रेसच्या दबावाखाली येऊन आपला निर्णय बदलला. या नंतरही शिवसेनेने नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात मतदान केले नाही. शिवसेनेचा हा निर्णय नागरिकत्व विधेयकावरून गोंधळ निर्माण करणारा आहे. शिवसेनेने विधेयकाला समर्थन केले नाही आणि विरोध केला नाही. यावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 04:43 PM IST

ताज्या बातम्या