Home /News /mumbai /

संजय राऊतांच्या 'च' शब्दावरुन भाजपही आक्रमक, तक्रार दाखल

संजय राऊतांच्या 'च' शब्दावरुन भाजपही आक्रमक, तक्रार दाखल

... तर लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा आम्ही जिंकू - संजय राऊत

... तर लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा आम्ही जिंकू - संजय राऊत

मुंबईतील त्या शब्दाचा परिणाम आता दिल्लीतही दिसून येत आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर : शिवसेनेचे (Shivnena) मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वापरलेल्या 'च' शब्दावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शरद पवारांसोबतच एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन भाजपने त्यांचा ट्रोल केलं. यानंतर मात्र प्रतिक्रिया देताना संजय राऊत चांगलेच संतापले. यादरम्यान त्यांनी 'च' शब्दही उच्चारला. यानंतर आता भाजप नेत्यांनीही संताप व्यक्त केला. या प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayou Kishori Pednekar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या विरोधात शिवसेनेने गुन्हा दाखल केला त्यानंतर आज आशिष शेलार हे पोलीस स्टेनशमध्ये उपस्थित झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते. त्याच दरम्यान दिल्लीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. हे ही वाचा-भाजपला मोठा झटका, आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल काय म्हणाले होते संजय राऊत? राज्यसभेच्या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या विरोधात निलंबित 12 खासदार हे संदसेदच्या परिसरात आंदोलन करत आहेत. या आंदोलनस्थळी मंगळवारी शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी संजय राऊत हे खुर्ची उचलून शरद पवारांना बसण्यासाठी देतानाचा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोवरुन भाजपनेही निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, "त्यावेळी तेथे लालकृष्ण अडवाणी जरी उपस्थित असते तर मी त्यांनाही खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचे वय लक्षात गेता महाराष्ट्रातल्या पितृतुल्य, वडीलधाऱ्या माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही जर गोष्ट गुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राराची संस्कृती नसून विकृती आहे." याच दरम्यान टीका करताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्दही उच्चारले आणि त्यावरुनच भाजपने आता संजय राऊतांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Delhi, Sanjay raut, Shivsena

    पुढील बातम्या