मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

...तर चीन आणि पाकिस्तानवर सर्जीकल स्ट्राईक करावा, संजय राऊतांचा खोचक टोला

...तर चीन आणि पाकिस्तानवर सर्जीकल स्ट्राईक करावा, संजय राऊतांचा खोचक टोला

कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

मुंबई, 10 डिसेंबर: कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असं विधान भाजप नेते रावसाहेब दानवे (BJP Leader Ravsaheb Danave) यांनी केलं आहे. त्यावरही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टीका केली आहे. जर केंद्र सरकारच्या मंत्र्यांकडे अशी माहिती असेल तर संरक्षण मंत्र्यांनी चीन आणि पाकिस्तानवर सर्जीकल स्ट्राईक करावा, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा...रावसाहेब दानवे यांचा DNA तपासावा लागेल, बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारला तोडगा काढायचा का नाही, हा प्रश्न आहे. सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सारखे आहेत. सरकारला तोडगा काढायचा असता तर निघाला असता, असा टोला देखील राऊतांनी लगावला. बिहारमध्ये एपीएमसीमध्ये या सुधारणा केल्या होत्या. भाजप शासित राज्यात या सुधारणा लागू करायला हव्यात. शेकरी आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा आहे. अराजकता माजवणाऱ्यांना धडा शिकवायला हवा. सरकारनं शेतकऱ्यांवर कायदा लादू नये, असं देखील संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

दानवेंच वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण...

संजय राऊत म्हणाले, रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांचं वक्तव्य केंद्र सरकारनं गांभीर्यानं घ्यावं. जर केंद्र सरकारच्या मंत्र्यांकडे अशी माहिती असेल तर संरक्षण मंत्र्यांनी चीन आणि पाकिस्तानवर सर्जीकल स्ट्राईक करावा, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.

महिलांबाबत राज्य सरकार प्रगतीशील राहिल आहे. शरद पवारांच्या नावानं योजना येणं ही चांगली गोष्ट आहे, देशाच्या योजनाही अशाच सुरु झाल्या पाहिजेत. या योजनेचं स्वागत आहे. ग्रामीण भागात पवारांचं मोठं योगदान, असं देखील संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?

कृषी बिल रद्द करावं की नाही यावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता रावसाहेब दानवेंनी देखील उडी घेतली आहे. त्यांन अजब वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांच्या अजब दाव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

हेही वाचा...भीषण अपघात! मॉर्निंग वॉक करणाऱ्या चौघांना टेम्पोनं चिरडलं, तिघांचा मृत्यृ

राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि NRC च्या माध्यमातून आधी मुस्लीम बांधवांची दिशाभूल केली पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत त्यामुळे आता शेतकऱ्यांचे कान भरण्याचं काम सुरू आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल असं सांगून त्यांचे कान भरण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप दानवेंनी केला आहे.

First published:

Tags: Maharashtra, Sanjay raut, Shiv sena