दाऊदच्या भावाला बिर्याणी खाऊ घालणे पोलिसांना पडले महागात!

दाऊदच्या भावाला बिर्याणी खाऊ घालणे पोलिसांना पडले महागात!

संध्याकाळी ६ वाजता पोलिसांना पैसे वाटप करून कासकर पुन्हा ठाणे कारागृहात परतला होता

  • Share this:

अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 27 आॅक्टोबर : वैद्यकीय तपासणीच्या बहाणे अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरला बिर्याणी खाऊ घालणे तसंच सिगारेट प्यायला देणे ५ ठाणे पोलिसांना महागात पडलंय. या कृत्याबद्दल पाचही पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहेत.

ठाण्यातील खंडणी प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून ठाणे कारागृहात असलेला डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर हा न्यायालयाच्या आदेशानंतर उपचारासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता दाखल झाला. मात्र, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तो सिव्हिल रुग्णालयात आवारात फिरून नातेवाईकांना भेटणे जेवण करणे आणि सिगारेट ओढणे एवढंच नाही तर गाडीत बसून चक्क बिर्याणीवर देखील कासकर याने ताव मारला होता.

हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर आणि त्यांच्या संरक्षणातच सुरू होता. संध्याकाळी ६ वाजता पोलिसांना पैसे वाटप करून कासकर पुन्हा ठाणे कारागृहात परतला होता.

हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकारची माहिती ठाणे पोलीस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळताच प्रकरणाची चौकशी करुन या प्रकरणात सामिल असलेल्या ५ पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे.

=============================================

VIDEO: मुंबईच्या लोकलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, क्षणात संपलं असतं आयुष्य पण...

First Published: Oct 27, 2018 05:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading