मुंबई, 08 ऑगस्ट : कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे जिकडे तिकडे कोरोनाचे नियम (corona rules) पायदळी तुटवले जात आहे. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Samajwadi Party MLA abu azmi) यांनीही वाढदिवसानिमित्त विना परवानगी रॅली काढली आणि कोरोना नियम भंग केले होते. त्यामुळे अबू आझमींसह 17 जणांवर गोवंडीच्या (govandi) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार अबू आझमी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संध्याकाळी 5.15 वाजेच्या सुमारास विना परवानगी रॅली काढली होती. या रॅलीत कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. या रॅलीत लोकांनी एकच गर्दी केली होती. तसंच, कुणीही मास्क वापरले नव्हते.
उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
अबू आझमी यांनी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी २५ ते ३० कार्यकर्त्यांचा जमाव करून महाराष्ट्र शासनाचे कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधक आदेश व जमावबंदी आदेशाचा भंग केला. अबू आझमी व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार हे हत्यार सुद्धा बाळगले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे हत्यार बंदी आदेशाचा भंग केला होता.
घरगुती उपायाने मिळवा wrinkle free त्वचा, रात्री केल्यास अधिक परिणामकारक
त्यामुळे अबू आझमी यांच्यासह 17 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे फिर्याद दाखल करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.क्रमांक -७७६/२१ कलम १८८,२६९, भा.द.वी.सह कलम ११ महाराष्ट्र कोव्हिड उपाय़ोजना २०२० सह कलम ४,२५भाहका. सह३७(अ)(१),१३५ मपोका.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.