युवासेनेच्या जिल्हाध्यक्षाच्या बर्थ डे पार्टीत मराठी अभिनेत्रीसोबत छेडछाड, पोलिसांत तक्रार दाखल

युवासेनेच्या जिल्हाध्यक्षाच्या बर्थ डे पार्टीत मराठी अभिनेत्रीसोबत छेडछाड, पोलिसांत तक्रार दाखल

मराठी अभिनेत्री गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी पुण्यातील शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव इथं एका कार्यक्रमात परफॉर्मन्स करण्यासाठी पोहोचली होती.

  • Share this:

मुंबई, 07 फेब्रुवारी : मराठी सिनेसृष्टीतील डान्सिंग क्वीन म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मराठी अभिनेत्री  गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजी पुण्यातील शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव इथं एका कार्यक्रमात परफॉर्मन्स करण्यासाठी पोहोचली होती. युवासेनेच्या जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यासोबत गैरवर्तन केलं असल्याचं तिने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी  तक्रार दाखल केली आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे.

हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झुंज सुरूच, प्रकृती चिंताजनक

दरम्यान, पीडितेवर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम प्रयत्नांची शर्थ करत असली तरी पीडितेची प्रकृती चिंताजनकच असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. एका तरुणाने प्राध्यापक असलेल्या पीडितेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती 40 टक्के भाजली होती. त्यानंतर तातडीने तिला नागपूरला हलविण्यात आलं होतं. पेट्रोलच्या धुरामुळे तिच्या श्वसन नलिकेत धुर गेला आणि ती भाजली गेली.

त्यामुळे श्वास घेण्यास तिला त्रास होतोय. तर डोळ्याच्या वरचा भाग, कानही जळाले आहेत. तिला अजुनही बोलता येत नाही. पुढचे काही दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे असून मुंबईचे डॉक्टरही नागपुरात दाखल झाले आहेत. तिच्या उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय.

गृहमंत्री अनिल देशमुख हे मंगळवारी मुंबईतले ख्यातनाम त्वचा तज्ज्ञ डॉ. सुनील केशवानी यांना नागपूरला घेऊन गेले होते. पीडित मुलीसाठी आजचा दिवस म्हणजे पुढचे 24 तास महत्त्वाचे असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असून तिच्या प्रकृतीसाठी सर्व राज्यातून प्रार्थना करण्यात येत आहे.

प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. त्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्या होत्या. श्वसन नलिका जळाली होती. त्यात धूर गेल्याने प्रचंड त्रास होत होता. डॉक्टरांनी कृत्रिम नलिका टाकत श्वास घेण्यात होत असलेला त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलंय. अशा पेशंटला इन्फेक्शन हे अतिशय लवकर होतं. त्यामुळे अतिशय काळी घ्यावी लागते, असंही डॉक्टरांनी सांगिलंय.

First published: February 7, 2020, 5:32 PM IST

ताज्या बातम्या