मुंबई, 11 जानेवारी : कोरोनाची (Corona) लाट ओसारत नाही तेच राज्यावर (Maharashtra) आता बर्ड फ्लूचे (bird flu) संकट कोसळले आहे. मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि दापोलीमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
'राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. याबाबत आधीच सर्व प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहे. पुढे काय करता येईल, काय नियोजन करायचे आहे, यासाठी सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे', अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
लालबहादूर शास्त्री यांचा ताश्कंदमध्ये मृत्यू की हत्या? 54 वर्षांनंतरही गूढ कायम
तसंच, 'आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये लस कशी वितरीत केली जाईल यासंदर्भात चर्चा होईल', असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मुंबईत काही दिवसांपूर्वी दोन कावळ्यांचा मृत्यू झाला होता. या कावळ्यांचा स्वॅब घेऊन ते भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकड पाठवण्यात आला होते. त्याचे अहवाल आज आले आहे. यात दोन्ही कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पूर्व परीक्षेची तारीख जाहीर
तसंच 9 जानेवारी रोजी ठाण्यातील विजय गार्डन्स या सोसायटीत अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. बगळा जातीतील हे पक्षी रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते. स्थानिकांनी या घटनेबद्दल पक्षी प्रेमी, पर्यावरण प्रेमी यांना बोलावून माहिती दिली. त्यानंतर ठाणे पालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी केल्यानंतर सर्व मृत पक्षांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर स्वॅब घेऊन ते भोपाळ इथं पाठवले होते. आज त्याचा अहवाल आला असून बर्ड फ्लूमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात 3 पाण बगळे आणि 1 पोपट बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
परभणीत बर्ड फ्लूमुळे 800 कोंबड्यांचा मृत्यू
दरम्यान, परभणीतील मुरुंबा गावातील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये 800 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर आता प्रशासनाने खबदारी म्हणून पावलं उचलली आहे. बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये म्हणून मुरुंबा गावातील 10 हजार कोंबड्या आज संध्याकाळपर्यंत नष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली. ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाला त्या 1 किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thane