Home /News /mumbai /

लॉकडाउनमध्ये मुंबईत रक्तरंजीत घटना, तरुणाने केला तिघांवर सपासप वार

लॉकडाउनमध्ये मुंबईत रक्तरंजीत घटना, तरुणाने केला तिघांवर सपासप वार

मुंबईतील शिवडी परिसरात पार्किंगच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्याची आल्याची धक्कादायक घटना समोर आली.

मुंबई, 22 एप्रिल : मुंबईत संचारबंदी लागू असताना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु, मुंबईतील शिवडी परिसरात पार्किंगच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्याची आल्याची धक्कादायक घटना समोर आली.  शेजारांसोबत झालेल्या भांडणात  या तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले. शिवडी क्रॉस रोड येथील महापालिका चाळ नंबर 46 च्या गल्लीत पार्किंगवरुन 16 वर्षीय अदनान पटेल या मुलाचे करीम शेख या 35 वर्षीय शेजारील तरुणाशी वाद झाला होता.  हा वाद इतका विकोपाला गेला की, अदनानचे दोघे भाऊ शाहीद आणि साहील हे दोघेही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर करीमचे देखील आई वडील आणि भाऊ घटनास्थळी आले. यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले. द हेही वाचा - हजारो भारतीयांच्या जीवाशी खेळ, चीनचे रॅपिड टेस्ट किट निघाले खराब मारहाण सुरू असताना करीम युसूफ याने त्याच्या जवळील चाकूने अदनान, शाहीद आणि साहीलवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, यात यात शाहीद गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचाराकरता जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शाहीदच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा -मुंबईमध्ये कोरोना मोठ्या संख्येने वाढणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा रिपोर्ट या हत्येप्रकरणी शिवडी पोलिसांनी करीम शेख, युसूफ शेख, मिनाज शेख आणि मेहराज शेख या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या