नवी दिल्ली, 04 मे : धावत्या बाईकवर KISS करणाऱ्या कपलचा आता पोलिसांनी शोध सुरू केला आहे. एका IPSनं दिल्लीच्या राजोरी गार्डन भागातील व्हिडीओ शुट करत ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतर धावत्या बाईकवर कपल KISS करतानाचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झाला होता. पश्चिम दिल्ली डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी व्हिडीओ शुट करणाऱ्या अधिकाऱ्याला बोलावलं असून या कपलवर कारवाई केली जाणार आहे. काळ्या बजाज पल्सरवर हे कपल KISS करताना दिसत आहे. दरम्यान, या कपलवर भादंवि कलम 279 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या कलमानुसार बाईक चालवण्यावर बंदी येऊ शकते. शिवाय, दोषी आढळ्यानंतर सहा महिन्यापर्यंत कैद आणि 1 हजार रूपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. सध्या पोलिस या कपलचा शोध घेत आहे.
धावत्या बाईकवर KISS करत होतं कपल; IPSनं शेअर केला व्हिडीओ
काय आहे त्या व्हिडीओमध्ये
देशाच्या राजधानीतील एका व्हायरल व्हिडीओची सर्वत्र जोरात चर्चा आहे. नेटीझन्स यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. IPSनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक कपल धावत्या बाईकवर चक्क KISS करताना दिसत आहेत. प्रेमी युगुलांचा हा व्हिडीओ IPSनं आपल्या ट्विटर अकांऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बाईकवरील जोडी KISS करताना दिसत आहे.
Need for new sections for #MV Act violations!! #Rajouri garden crossing. pic.twitter.com/0gn7LsIIYM
— HGS Dhaliwal IPS (@hgsdhaliwalips) May 2, 2019
दरम्यान, हा व्हिडीओ राजोरी गार्डन परिसरातील असल्याचं IPSचं म्हणणं आहे. या व्हिडीओमध्ये एक कपल बाईकवरून प्रवास करत आहे. त्यावेळी मुलगी बाईकच्या टाकीवर बसून मुलाला मिठी मारत आहे. शिवाय, KISS देखील करताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर आता अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
Rahul Gandhi EXCLUSIVE, 'मोदींबाबत माझ्या मनात राग नाही'