सोमवारी मुंबईत गेल्या तीन वर्षांमधला सर्वात जास्त पाऊस

सोमवारी मुंबईत दिवसभरात तब्बल 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.गेल्या तीन वर्षातला एका दिवसातला हा सर्वात जास्त पाऊस आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2017 10:10 AM IST

सोमवारी मुंबईत गेल्या तीन वर्षांमधला सर्वात जास्त पाऊस

18 जुलै : मुंबईसह उपनगरांत पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे.आज दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर दुसरीकडे सोमवारी मुंबईत गेल्या तीन वर्षांमधल्या सर्वात जास्त पावसाची नोंद झाली.

सोमवारी मुंबईत दिवसभरात तब्बल 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.गेल्या तीन वर्षातला एका दिवसातला हा सर्वात जास्त पाऊस आहे.या आधी 30 जुलै 2016 मध्ये 114 मिलीमीटर पावसाची नोंद होती. दमदार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवढा करणाऱ्या तलावांमध्ये 68 टक्के पाणीसाठा निर्माण झालाय.

सात तलावांमधला पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत

2017

9.8 दशलक्ष लीटर

Loading...

2016

7.1 दशलक्ष लीटर

2015

2.75 दशलक्ष लीटर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 10:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...