मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई लोकलबाबत पुन्हा मोठी अपडेट, सर्वसामान्यांसाठी सेवा कधी सुरू करायची? रेल्वेची सरकारकडे विचारणा

मुंबई लोकलबाबत पुन्हा मोठी अपडेट, सर्वसामान्यांसाठी सेवा कधी सुरू करायची? रेल्वेची सरकारकडे विचारणा

रेल्वे राज्य सरकारच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

रेल्वे राज्य सरकारच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

रेल्वे राज्य सरकारच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 1 नोव्हेंबर : रेल्वे सर्वसामान्यांसाठी कधीपासून सुरू करणार, याबाबतचं प्रशचिन्ह अजूनही कायम आहे. कारण आता रेल्वे राज्य सरकारच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकल कधीपासून सर्वसामान्यांना सुरू करावी, अशी विचारणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. राज्य सरकारने 28 ऑक्टोबरला रेल्वेला लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करावी, अशी विनंती केली होती. मात्र या पत्रात तारखेचा उल्लेख करण्यात आला नव्हता.

रेल्वेच्या उद्यापासून 2773 लोकल धावणार आहेत. ज्या एकूण क्षमतेच्या 88% आहेत. आतापर्यंत 1410 लोकल ट्रेन धावत होत्या. त्यामुळे राज्य सरकार काय तारीख कळवतं, यावर सर्वसामान्यांना लोकल सुरू करण्याचा निर्णय अवलंबून असणार आहे.

मुंबई लोकलबाबत काय म्हणाले राज्याचे गृहमंत्री?

'लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत राज्य सरकारने सविस्तर वेळापत्रक रेल्वेला दिलं आहे. गर्दी होऊ नये या अनुषंगाने हे वेळापत्रक दिलं आहे. लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाली तर त्यांना दिलासा मिळेल. यात रेल्वेने राजकारण करू नये. यापूर्वीही परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावी पाठवताना रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात वाद झाला होता,' असं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई लोकल सुरू करण्याबाबत आपलं मत मांडलं आहे.

दरम्यान, कोरोना (Corona)च्या काळात मुंबईची लाइफलाइन असणारी लोकल सामान्य माणसांसाठी अनेक महिन्यांपासून बंद आहे. आयएएस अधिकारी आणि महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीत याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

कार्यालयांच्या वेळा, गर्दीचं नियोजन, सॅनिटायजेशन या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मुंबईतील लोकल सामान्यांसाठी सुरू करता येणं शक्य आहे, असं ते म्हणाले. लोकांचे जीव वाचवणं याला प्रशासनाचं प्राधान्य आहे, परंतु उदरनिर्वाह करण्यासाठी घराबाहेर पडणं नागरिकांची गरज आहे, असं मत निंबाळकर यांनी व्यक्त केलं. सेंट्रल रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यासंबंधीचं पत्र बुधवारी 28 ऑक्टोबरला लिहिलं आहे.

First published:

Tags: Mumbai, Mumbai local