Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा हादरा; ठाण्यानंतर नवी मुंबईतून आली धक्कादायक बातमी

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा हादरा; ठाण्यानंतर नवी मुंबईतून आली धक्कादायक बातमी

खरी शिवसेना कोणाची, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

    मुंबई, 7 जुलै : उद्धव ठाकेंच्या हातातून राज्याची सत्ता गेली, यानंतर आता त्यांच्यासमोर पक्ष वाचवण्याचं आव्हान उभं आहे. आता तर त्यांना आपला गड वाचवणं अवघड झालं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या दोन दिवसात ठाणेदेखील उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हातातून निसटताना दिसत आहे. महानगरपालिकेचे (j) 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं आहे. या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि त्यांनी याबाबत घोषणा केली. ठाण्यातूनही हे वृत्त समोर आल्याच्या काही तासात नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेला खिंडार पडलं आहे. नवी मुंबईतील 30 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे. विजय चौगुलेच्या माध्यमातून शिंदे गटाला पाठिंबा देण्यात आला आहे. आज रात्री 9 वा नंदनवन बंगल्यावर हे नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. दरम्यानस राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदे (eknanth shinde) यांच्या गळ्यात पडली. खुद्ध भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनीच याबद्दल घोषणा केली होती. अखेर आज एकनाथ शिेंदे यांनी मंत्रालयामध्ये कारभार स्विकारला. यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा हात धरून खुर्चीवर बसवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात (mumbai mantralaya) पोहोचले. आज त्यांचा मंत्रालयातला पहिलाच दिवस आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपचे नेते पोहोचले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस यांचा शाल देऊन सत्कार केला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thackarey

    पुढील बातम्या