अजित पवारांना एकाच दिवसात दुसरा धक्का, जाणून घ्या काय झालं!

अजित पवारांना एकाच दिवसात दुसरा धक्का, जाणून घ्या काय झालं!

नागपूर अधिवेशनानंतर अजित दादांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल मात्र महत्त्वाचं खातं दिलं नाही तर त्याला फारसा अर्थ नाही असं सांगितलं जातंय.

  • Share this:

मुंबई 12 डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 दिवसानंतर बहुप्रतिक्षीत खातेवाटप जाहीर केलंय. गेल्या काही दिवसांपासून केव्हा खातेवाटप जाहीर करणार असा प्रश्न विचारला जात होता. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 16 तारखेपासून नागपुरात सुरू होतंय. त्यामुळे तातडीने हे खातेवाटप जाहीर करण्यात आलंय. यात सर्वात सर्वाचं लक्ष लागलं होतं ते गृहखात्याकडे. हे खातं राष्ट्रवादीकडे जाईल असं म्हटलं जात होतं. पण अखेर वाटाघाटीत शिवसेनेनं बाजी मारली आणि हे महत्त्वाचं खातं शिवसेनेने राखण्यात यश मिळवलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे या खात्यासाठी आग्रही असल्याचीही चर्चा होती. मात्र हे गृहखातं हे शिवसेनेने ठेवल्याने हा अजित पवारांना धक्का मानला जातोय. तर उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी दुसऱ्या नावाचा विचार करत असल्याचं बोललं जातंय त्यामुळे अजित पवारांना हा दुसरा धक्का असल्याचं बोललं जातंय.

अखेर खातेवाटप जाहीर, गृह खातं शिवसेनेकडे तर तिजोरीच्या किल्ल्या राष्ट्रवादीकडे

देवेंद्र फडणवीसांसोबत जात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रात भूकंप झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये अजित दादा राष्ट्रवादीत परत आले. या बंडाच्या पावित्र्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला. मात्र चांगलं पद आणि मान सन्मान पहिल्यासारखाच मिळेल या अटीवरच अजित दादा परत आलेत असं राष्ट्रवादीतल्या सूत्रांनी सांगितलं होतं.

मात्र अजित दादांना लगेच पद दिल्यास त्याचा पक्षात चुकिचा संदेश जाईल असं शरद पवारांनी सांगितलं होतं. त्यामुळे अजित पवारांचा समावेश हा नागपूर अधिवेशनानंतर होणार असलं बोललं जातंय. त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं मात्र महत्त्वाचं खातं दिलं नाही तर त्याला फारसा अर्थ नाही असं सांगितलं जातंय. मात्र उपमुख्यमंत्रिपद हे जयंत पाटील यांच्याकडे देण्याचा शरद पवारांचा विचार असल्याची शक्यता असल्याने दादांना पुढेचे काही दिवस कसोटीचे राहणार आहेत.

CABवरून महाराष्ट्रात सरकारचा पाठिंबा काढणार का? काँग्रेस मंत्र्याचा खुलासा

असं आहे खाते वाटप

काँग्रेस

बाळासाहेब थोरात - महसूल, उर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेक शिक्षण, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय

नितीन राऊत -  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण

राष्ट्रवादी

जयंत पाटील - वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास

छगन भुजबळ -  ग्रामविकास, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

शिवसेना

एकनाथ शिंदे - गृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

सुभाष देसाई - उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खार भूमी विकास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ajit pawar
First Published: Dec 12, 2019 06:22 PM IST

ताज्या बातम्या