Home /News /mumbai /

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; जबरदस्तीने तरुणींच्या शरीराचा व्हायचा सौदा, 6 जणींची सुटका

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; जबरदस्तीने तरुणींच्या शरीराचा व्हायचा सौदा, 6 जणींची सुटका

Crime in Mumbai: मुंबईनजीक असणाऱ्या पनवेल याठिकाणी खंडेश्वर पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Sex racket exposed) केला आहे. येथे काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता.

    पनवेल, 04 फेब्रुवारी: मुंबईनजीक असणाऱ्या पनवेल याठिकाणी खंडेश्वर पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Sex racket exposed) केला आहे. या छापेमारीत पोलिसांनी पीडित तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक (2 accused arrested) केली आहे. तसेच एकूण सहा जणींची सुटका केली आहे. संबंधित आरोपी परराज्यातील रहिवासी असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना 5 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडेश्वर पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील खन्दा कॉलनी परिसरातील एका इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू होता. याठिकाणी काही तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संबंधित ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून सहा तरुणींची सुटका केली आहे. हेही वाचा-पतीच निघाला मास्टरमाइंड; वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजेंच्या हत्येचं उलगडलं गूढ संबंधित तरुणींना उत्तर प्रदेश, राज्यस्थान, आगरा आणि दिल्ली परिसरातील विविध ठिकाणाहून आणल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. संबंधित तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. आरोपी तरुण हे पीडित तरुणींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होते. ग्राहकांकडून मोठी रक्कम घेतली जात होती. ज्यामधून आरोपींना कमीशन मिळत होतं. आरोपींकडून पीडित मुलीच्या शरीराचा दररोज सौदा केला जात होता. हेही वाचा-घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य; भयंकर प्रकारानंतर पीडितेचं टोकाचं पाऊल या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापेमारी करत सहा तरुणींची सुटका केली असून त्यांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी बिहार तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Crime news, Fake sex racket, Maharashtra, Mumbai, Sex racket, Sexual assault, Sexual harassment, Sexual offences

    पुढील बातम्या