मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता, 2 नव्या नेत्यांना संधी मिळणार?

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता, 2 नव्या नेत्यांना संधी मिळणार?

मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात येणार असून नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात येणार असून नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खातेबदल होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडे गृहनिर्माण खातं दिलं जाण्याचीही शक्यता आहे. तर त्याबदल्यात कृषीसह एक वाढीव मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकतं. गृहनिर्माण, कृषी, रोजगार हमी, उत्पादन शुल्क, कामगार , अल्पसंख्यांक या खात्यांमध्ये खांदेपालट होणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असंही समजते. त्यामुळे या दोन्ही पक्षातील मंत्रिमंडळात सामील होणार हे नवे चेहरे कोण, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, एकीकडे राज्य सरकार अस्थिर असून केव्हाही सत्तापालट होऊ शकते, असा दावा भाजपकडून केला जात असतानाच महाविकास सरकारमध्ये मांत्र खांदेपालट होत आहे.

...तर जितेंद्र आव्हाड यांना कोणती जबाबदारी मिळणार?

नव्या बदलानुसार सध्या राष्ट्रवादीकडे असणारं गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. जर खरोखरंच असा बदल झाला तर सध्या हे खातं ज्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आगामी काळात नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार? याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे. तसंच शिवसेना या खात्यासाठी कोणत्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 13, 2020, 6:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading