मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा

Big relief for Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून एक मोठा दिलासा मिळाला आहे.

Big relief for Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून एक मोठा दिलासा मिळाला आहे.

Big relief for Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून एक मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 25 ऑगस्ट : मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी नारायण राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नारायण राणेंच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाकडून (High Court) एक मोठा दिलासा मिळाला आहे. (Big Relief for Narayan Rane)

नारायण राणे यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 117 सप्टेंबर रोजी होणार आहे. तसेच तोपर्यंत नारायण राणेंना अटक करण्यात येणार नसल्याची तसेच त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 17 सप्टेंबरपर्यंत एक दिलासा मिळाला आहे.

नारायण राणेंच्या अटकेचं प्रकरण संशयास्पद, सर्व प्रकरणाची CBI चौकशी करा : आशिष शेलार

नारायण राणेंच्या विरोधात इतर ठिकाणी जिथे गुन्हे दाखल आहेत त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. नारायण राणेंनी 23 ऑगस्ट रोजी केलेले वक्तव्य प्रक्षोभक नव्हते अशी प्रतिक्रिया नारायण राणेंचे वकील अॅड सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात नारायण राणेंच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. यामध्ये महाड, नाशिक, पुणे आणि ठाण्याचा समावेश आहे. मात्र, हे सर्व गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी मागणी करणाची याचिका नारायण राणेंनी हायकोर्टात केली होती आणि त्यावर आज सुनावणी झाली.

First published:

Tags: Narayan rane