मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठा दिलासा! दैनंदिन रुग्णसंख्येत 6 हजारांनी घसरण; रिकव्हरी रेट सुद्धा वाढला

मोठा दिलासा! दैनंदिन रुग्णसंख्येत 6 हजारांनी घसरण; रिकव्हरी रेट सुद्धा वाढला

राज्यात दररोज होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आज कमी दिसून आली आहे. ही महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे.

राज्यात दररोज होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आज कमी दिसून आली आहे. ही महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे.

राज्यात दररोज होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आज कमी दिसून आली आहे. ही महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 2 मे: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात 60 हजारांहून अधिक रुग्णांची दररोज वाढ होत होती. या रुग्णवाढीला आता ब्रेक लागला आहे कारण, आज रुग्णांच्या संख्येत घसरण (covid numbers decreased in Maharashtra) झाली आहे. आज राज्यात 56,647 नवीन रुग्णांचे निदान (56647 new cases) झाले आहे. जे कालच्या तुलनेत जवळपास 6600 हून कमी आहे. 1 मे रोजी राज्यात 63282 नवीन रुग्णांचे निदान झाले होते. म्हणजेच दैनंदिन रुग्णसंख्येत सहा हजारांहून अधिक घसरण झाली आहे आणि महाराष्ट्रासाठी (Maharashtra) ही एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रात आज 56,647 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 51,356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 39,81,658 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.31 टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,76,52,758 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 47,22,401 म्हणजेच 17.8 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज कुठल्या विभागात किती रुग्ण? ठाणे विभाग - 9700 पुणे विभाग - 15776 कोल्हापूर विभाग - 3828 औरंगाबाद विभाग - 3240 लातूर विभाग - 3569 अकोला विभाग - 3601 नागपूर विभाग - 8909 सलग चौथ्या दिवशीही मुंबईतील लसीकरण केंद्र राहणार बंद, केवळ 'या' नागरिकांना मिळणार लस राज्यातील जिल्हा-मनपानिहाय रुग्णांचा तपशील
अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
मुंबई महानगरपालिका३६२९६५५९९७७९१३२९४
ठाणे१०९२८६७७८११२३
ठाणे मनपा७५११२३३३११२१६१५
नवी मुंबई मनपा४७०१०२५२५१०१३४२
कल्याण डोंबवली मनपा७४२१२८९९९३०१२७९
उल्हासनगर मनपा७२१९२४०४२१
भिवंडी निजामपूर मनपा२४१०२४६३८८
मीरा भाईंदर मनपा३१३४८३१३७८९
पालघर६०१३४८९७३४४
१०वसईविरार मनपा७०४५६४५२८९३
११रायगड९२८६६२४४१२७७
१२पनवेल मनपा३७४५८१३८८५७
ठाणे मंडळ एकूण९७००१३९११६०१५६२३६२२
१३नाशिक९३४११३५४४१९१३७०
१४नाशिक मनपा१८७९१९८५४११६१५७३
१५मालेगाव मनपा१०८९९६२०५
१६अहमदनगर३०१६१२४७२२२०१२८६
१७अहमदनगर मनपा५५६५३९४४१४७६१
१८धुळे१४२२१६९०२४२
१९धुळे मनपा८४१६६८५१९३
२०जळगाव७२९९१४५११५१४६५
२१जळगाव मनपा४०३२९६०८४७३
२२नंदूरबार२७१३५३३९५७४
नाशिक मंडळ एकूण८०२४६९४५२०९२८१४२
२३पुणे४६२१२१५३९२२५१८
२४पुणे मनपा४१९४४३९४२०५३५६६३
२५पिंपरी चिंचवड मनपा२८५४२१००८७१५२६
२६सोलापूर१७०८८३४९०१९१५५०
२७सोलापूर मनपा२५८२७३६७३०११०८
२८सातारा२१४११०७१४७१५२३२३
पुणे मंडळ एकूण१५७७६१०८२९०३१२९१४६८८
२९कोल्हापूर११७३४८२७०१३३९
३०कोल्हापूर मनपा३००२०३७५४६३
३१सांगली११५८५६९०४२५१३७६
३२सांगली मिरज कुपवाड मनपा२५५२५४५६७२४
३३सिंधुदुर्ग४३२१३५५३१०३५४
३४रत्नागिरी५१०२४७३०५२२
कोल्हापूर मंडळ एकूण३८२८१८९२८८४०४७७८
३५औरंगाबाद५०४४२४३३४७९
३६औरंगाबाद मनपा५२५८४४४७१५१६
३७जालना८७९४५८७६१०६६०
३८हिंगोली३४०१४२१२१११९७
३९परभणी८१६२२७१३३२८
४०परभणी मनपा१७६१५६१३२८०
औरंगाबाद मंडळ एकूण३२४०२२५२९४३६३४६०
४१लातूर८५७५३९८०२३७९६
४२लातूर मनपा२४६१९७३६३७५
४३उस्मानाबाद६१२४०९६७२२९५२
४४बीड१३५१५७९१११६९३९
४५नांदेड३८५४०७४२१३९३०
४६नांदेड मनपा११८४१६२०१०७१७
लातूर मंडळ एकूण३५६९२५४९५६८८४७०९
४७अकोला१६४१५२०१२१५
४८अकोला मनपा३२५२६६१६४१३
४९अमरावती५००२७४६८१६५०२
५०अमरावती मनपा१६१३७८८१४२९
५१यवतमाळ९८८५२९८२२८१००९
५२बुलढाणा१११२४७५६६३७२
५३वाशिम३५१२७८९४१०३१२
अकोला मंडळ एकूण३६०१२३५६०८६३३२५२
५४नागपूर२१८८१०४१२२१२८२
५५नागपूर मनपा२८५९३२९३२६२५३९३९
५६वर्धा८३६४४४९१५५३
५७भंडारा६३०५२०५९५००
५८गोंदिया५५७३३६९०३४६
५९चंद्रपूर११८१४१६८५१०४४६
६०चंद्रपूर मनपा२१९२२३४१२५४
६१गडचिरोली४३९२०८१२१९५
नागपूर एकूण८९०९६४८५२६६५७५१५
इतर राज्ये /देश१४६११८
एकूण५६६४७४७२२४०१६६९७०२८४
राज्यात आज 669 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 350 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 153 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 166 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यातील मृत्यू दर हा 1.49 टक्के इतका आहे.
First published:

Tags: Coronavirus, Maharashtra

पुढील बातम्या