मोठी बातमी! भाजपला मुंबई महापालिकेत जोरदार धक्का, कोर्टाने दिले हे आदेश

मोठी बातमी! भाजपला मुंबई महापालिकेत जोरदार धक्का, कोर्टाने दिले हे आदेश

उच्च न्यायालयाने भाजपने केलेली याचिका फेटाळून लावली आहे

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : कोरोनाची रुग्णसंख्या अद्यापही नियंत्रणात आणण्यात यश आलं नसल्याने मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईत आंदोलन उगारलं आहे. दरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे.  मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपनं उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

उच्च न्यायालयाने भाजपने केलेली याचिका फेटाळून लावल्यामुळे विरोधी पक्षनेता पद हे काँग्रेसकडेच राहणार आहे. काँग्रेसचे रवी राजा हे सध्या विरोधी पक्षनेता पदावर आहेत. आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबई महापालिकेत शिवसेनेला सहकार्य करण्याची भूमिका भाजपने मागे घेतली होती. त्याच्यानंतर भाजपने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानुसार मुंबई महानगरपालिकेत विरोध पक्षनेता पदासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. सत्ताधारी पक्षा खालोखाल नगरसेवक असल्यामुळे आपल्याला हे पद मिळावे अशी मागणी भाजपनं केली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजप सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं भाजप कडून सांगण्यात आलं आहे.

हे ही वाचा-बँकिंग सेक्टरमध्ये मोठ्या बदलाची गरज; रघुराम राजन, विरल आचार्यांनी सुचवले पर्याय

दरम्यान आज शिवसेनेने सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांसह टीका केली आहे. मुळात फडणवीस यांचे सरकार जाणार नाही या भ्रमात येथील प्रशासन निवडणुकीआधी आणि नंतर काही काळ होते. ते त्याच भ्रमात तरंगत होते. पाच वर्षे फडणवीस व भाजपने एकछत्री अंमल गाजवला. प्रशासनावर फडणवीस सरकारचा अंमल होता व पुनःपुन्हा आम्हीच येणार या विधानाची धुंदी होती. त्यामुळे पोलीस असतील किंवा मंत्रालय, महसूल खाते एकजात सर्व अधिकारी वर्ग त्याच संघधुंदीत गुंग झाला होता. अनेक महत्त्वाच्या नेमणुका संघ परिवाराच्या शिफारशीने किंवा हस्तक्षेपाने होत असत. पोलीस अधिकारी, आयुक्त, सरकारी वकिलांच्या नेमणुकांत हे सर्रास घडत होते. ' असा खुलासाच शिवसेनेनं केला.

Published by: Meenal Gangurde
First published: September 21, 2020, 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading