मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी : मुंबई विद्यापीठातील आयडॉलच्या अंतिम वर्ष परीक्षांच्या तारखा जाहीर

मोठी बातमी : मुंबई विद्यापीठातील आयडॉलच्या अंतिम वर्ष परीक्षांच्या तारखा जाहीर

आयडॉलच्या एकूण 21 पैकी 17 परीक्षा उद्या सुरू होत असून 4 परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

आयडॉलच्या एकूण 21 पैकी 17 परीक्षा उद्या सुरू होत असून 4 परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

आयडॉलच्या एकूण 21 पैकी 17 परीक्षा उद्या सुरू होत असून 4 परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

मुंबई, 18 ऑक्टोबर : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने स्थगित केलेल्या अंतिम वर्षाच्या व बॅकलॉग परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून या परीक्षा 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. आयडॉलच्या एकूण 21 पैकी 17 परीक्षा उद्या सुरू होत असून 4 परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. अंतिम वर्ष बीएस्सी आयटी सत्र 6, तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, एमएस्सी भाग 2 गणित, आयटी व कॉम्प्युटर सायन्स व एमए शिक्षणशास्त्र भाग 2 या परीक्षा व बॅकलॉगच्या प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, बीएस्सी आयटी सत्र 4 व 5 आणि एमसीए सत्र 1 ते 5 या परीक्षा 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. या सर्व परीक्षांच्या सराव परीक्षा पूर्ण झालेल्या आहेत. तर तृतीय वर्षे बीए व बीकॉम या परीक्षा 26 ऑक्टोबरपासून ऑनलाईन सुरू होत असून, पदव्युत्तर वर्ष व्दितीय वर्षाच्या एमएची परीक्षा 2 नोव्हेंबरपासून तर द्वितीय वर्ष एमकॉमची परीक्षा 6 नोव्हेंबरपासून ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या सराव परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहेत. दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. मात्र नंतर परीक्षा घेण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. कोरोना काळात होत असलेल्या या परीक्षांवेळी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या