नवी मुंबई, 8 ऑक्टोबर : मुंबईतील क्रूझवर ड्रग्ज पार्टीचा (Drug party on cruise) पर्दाफाश झाल्याच्या घटनेने खळबळ उडालेली असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतून मोठा ड्रग्जचा साठा जप्त (Heroin worth rs 125 crore seized from Nhava Sheva port Navi Mumbai) करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. डीआरआयने (DRI Mumbai) नवी मुंबईतील नाव्हा शेवा बंदरावर ही कारवाई केली आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे.
125 कोटींचं हेरॉईन जप्त
न्यूज एजन्सी एएनआयने या संदर्भात वृत्त दिलं आहे. एएनआयने ट्विटमध्ये म्हटलं, डीआरआय मुंबईने बुधवारी न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून 25 किलो हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची किंमत तब्बल 125 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकऱणी एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
Directorate of Revenue Intelligence (DRI) Mumbai on Wednesday seized 25 Kg heroin worth Rs 125 crores from a container at Nhava Sheva Port. One business has been arrested and sent to custody till October 11: DRI Mumbai
— ANI (@ANI) October 8, 2021
पुण्यात लाखोंचा चरस जप्त
राजगड पोलिसांनी आज पहाटे मुंबई-गोवा हायवेवर, खेड-शिवापूर टोल नाक्यावर अमली पदार्थ घेऊन जात असणाऱ्या एका आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून सहा किलोंचा चरस साठा जप्त करण्यात आला आहे. या चरसची किंमत अंदाजे 24 लाख रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईहून गोवा कडे जात असणाऱ्या एक प्रवासी अमली पदार्थ घेऊन जात असल्याची राजगड पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, एपीआय मनोज नवसारे यांच्या पथकाने खेड शिवापुर टोलनाक्याजवळ डॉल्फिन ट्रॅव्हल्सने जात असणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली असता, मुळचा नेपाळच्या एका प्रवाशाकडे अंदाजे सहा किलो वजनाचा चोवीस लाखांचा चरस त्याच्या बॅगेमध्ये मिळून आला आहे.
या प्रवाशाला राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याबरोबर अजून कोण साथीदार आहेत का, या अमली पदार्थाची कोठे-कोठे विक्री करणार होता? याचा अधिक तपास राजगड पोलीस करत आहेत.
Drug Case: भाजप नेत्याच्या मेहुण्याला NCB नं सोडलं?, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर एनसीबीने धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून त्यात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. दरम्यान एनसीबीच्या कारवाईवर नवाब मलिकांनी काही गंभीर आरोप करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आजही त्यांनी या प्रकरणी एक गौप्यस्फोट केला आहे. या कारवाई दरम्यान भाजप नेत्याच्या एक मेहुण्याला सोडून दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
क्रूझवरील ड्रग्स पार्टीतून ताब्यात घेतलेल्यांपैकी दोन जणांना सोडण्यातं आलं असं म्हणत त्यात भाजप नेत्याच्या एका मेहुण्याला सोडून देण्यात आल्याचा नवाब मलिकांनी आज केला आहे. भाजप नेत्याचा मेहुणा कारवाईतून कसा सुटला? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.