Home /News /mumbai /

मोठी बातमी : राजकीय नेता आणि उद्योगपतीची हत्या करणाऱ्या मिर्ची गँगच्या म्होरक्याला मुंबईतून अटक

मोठी बातमी : राजकीय नेता आणि उद्योगपतीची हत्या करणाऱ्या मिर्ची गँगच्या म्होरक्याला मुंबईतून अटक

मिर्ची गँगच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सदर म्होरक्‍यास व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

मुंबई, 5 ऑगस्ट : उद्योगपती व राजकीय नेत्याची हत्या करुन मागील एक वर्षापासून फरार झालेला उत्तरप्रदेश रान्यातील कुख्यात मिर्ची गँगच्या म्होरक्‍यास मुंबईमध्ये जेरबंद करण्यात आलं आहे. सप्टेंबर 2019 मध्ये धौलाना पोलीस ठाणे (जिल्हा. हपड उत्तर प्रदेश) च्या हद्दीत कुविख्यात मिर्ची गँगच्या म्होरक्याने व त्याच्या साथीदारांनी दिवसा ढवळ्या चारचाकी वाहनातून येवून गोळीबार करत भारतीय जनता पार्टीचा स्थानिक नेता राकेश शर्मा, वय 35 वर्षे यांची गोळया मारुन हत्या केली होती. त्याबाबत धौलाना पोलीस ठाणे (जिल्हा- हापुड, उत्तर प्रदेश) येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. जानेवारी 2020 मध्ये फेज-3, नोएडा पोलीस ठाणे हद्दीत नोएडा स्थित प्रसिध्द उद्योगपती गौरव चांडेल, वय 45 वर्षे यांची कुविख्यात मिर्ची गँगच्या म्होरक्‍याने व त्याच्या साथीदारांनी डोक्यात गोळी मारुन हत्या केली व त्याची किया सेल्डोज कंपनीची कार जबरीने चोरुन नेली होती. त्याबाबत नोएडा पोलीस ठाणे येथेही गुन्हा नोंद करण्यात आला होता. मिर्ची गँग मिर्ची गॅंग ही गुन्ह्यांकरीता चोरलेल्या वाहनांचा वापर करत असे. मिर्ची गँगच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सदर म्होरक्‍यास व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सदर गुन्हयामध्ये गोळीबार करणारा मिर्ची गॅगचा म्होरक्‍या हा गुन्हा केल्यानंतर पंजाब, हरीयाना, दिल्ली, महाराष्ट्र अशा वेगवेगळया राज्यात अस्तित्व लपवून रहात होता. त्याकरीता उत्तरप्रदेश पोलीसांनी सदर राज्यांत जाऊन, वेगवेगळया धडक मोहीमा राबवून त्यास पकडण्याचे अनेकदा प्रयत्न केले होते, परंतु मुख्य आरोपी हा त्यांना सतत गुंगारा देवन पळन जाण्यात यशस्वी होत होता. उत्तर प्रदेश गुन्हे शाखेचे पथक हे सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई येथे आले होते. त्या अनुशंगाने वरिष्ठांनी सदर आरोपीचा शोध घेण्याबाबतच्या सूचना कक्ष 11, गुन्ह प्रकटीकरण शाखेस दिल्या होत्या. तपासात गुन्हयातील मुख्य पाहिजे आरोपी हा नाव व वेश बदलून लपून छपून मुंबई मध्ये वेगवेगळया ठिकाणी मागील काही महिन्यांपासून राहत असल्याची विश्‍वसनीय माहिती कक्ष 11, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी झिने यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या 'पथकाने एकता नगर (कांदविली पश्‍चिम), बेहराम बाग (जोगेश्‍वरी पश्‍चिम), इरला मार्केट/प्रेमनगर (विले पार्ले पश्‍चिम) परिसरात पाळत ठेवली होती. खास बातमीदारांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करून पथकाने अहोरात्र मेहनत करून मानवी कौशल्याचा वापर केला. त्यानंतर आरोपी इसमाच्या हालचालींचा वेध घेवून त्यास आज रोजी इरला मार्केट/प्रेमनगर (विले पार्ले, पश्‍चिम) परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने उपरोक्‍त दोन्ही गुन्हे केल्याची व सदर गुन्हयात अटक होवू नये म्हणून मागील एक वर्षापासून तो नाव व वेशांतर करुन पंजाब, हरीयाना, दिल्ली, महाराष्ट्र येथे राहत होता अशी माहीती दिली. अटक मुख्य आरोपी हा उत्तरप्रदेश, दिल्ली परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून, तो मिर्ची गॅग नांवाने कुप्रसिध्द टोळी चालवित आहे. या टोळीने अनेक गंभीर अपराध केलेले आहेत व गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची माहीती मिळाली आहे. सदर टोळीच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे समाजात वाढलेली भीती पाहून त्यास वेळीच पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलीसांनी अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले होते. मुख्य आरोपी विरुध्द उत्तरप्रदेश राज्यातील बुलन्द शहर, भोजपूर, कविनगर, मुंडा पाडे, पिल्खुवा, बाबुगढ, घौलाना, हापुडनगर, फेज-3 या विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, चोरी, अग्शिस्त्राचा वापर, गुन्हेगारी टोळी चालविणे वगैरे स्वरूपाचे 19 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीस अटक करुन गुन्हे शाखा हापुड, उत्तरप्रदेश यांच्या ताब्यात पुढील कायदेशीर कारवाईकरीता दिले आहे. अटक आरोपी :- 1) प्रविण उर्फ आशु उर्फ आकाश राजेंद्र सिंग, वय 32 वर्षे, व्यवसाय- फळ विक्रेता, रा.ठी. आलुवाडी, इला मार्केट, प्रेम नगर, विलेपार्ले पश्‍चिम, मुंबई.. ( मूळ गाव- काझीपुरा, पोस्ट- दालना, थाना- मसूरी , ता. जि. गाजियाबाद, उत्तरप्रदेश.)
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या