मुंबई, 25 फेब्रुवारी : मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकं ठेवलेली गाडी साडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबई शहरासह उपनगरांमध्ये हाय अलर्ट (Mumbai High Alert) जारी केला आहे. तसंच बेवारस गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाकाबंदी करुन चोख सुरक्षा करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तालयातून जारी करण्यात आले आहेत.
मुंबईतील पेडर रोड परिसरात एका गाडीत 20 जिलेटीनच्या कांड्या आढळल्या. याप्रकरणी तपासला वेग आला असून अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करण्यात आली आहे. याप्रकरणी तपासासाठी एकूण 7 टीम तयार करण्यात आल्या आहेत. तसंच 20 पेक्षा जास्त वरीष्ठ पोलीस अधिकारी तपासात सामील आहेत. मुंबई पोलीस वाहतूक विभाग देखील तपासात सहभागी आहे.
हेही वाचा - मुंबईच्या महत्त्वाच्या रस्त्यावर जिलेटिन स्फोटकं; काय घडलं, कुणी ठेवली 10 पॉइंटरच्या आधारे समजून घ्या
ज्या गाडीत स्फोटकं ठेवण्यात आली होती, त्या गाडीची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. गाडीची संपूर्ण माहिती मिळवण्याकरता RTO अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. गाडीची नेम प्लेट आणि चेसी नंबर मॅच होत नाही. त्यामुळे नंबर प्लेट बनावट असण्याची शक्यता आहे.
कशी उघड झाली घटना?
पेडर रोड परिसरातील कारमायकल रोडवर ही स्फोटकं ठेवलेली गाडी आढळली. गाडी नो पार्किंगमध्ये उभा असल्याने ट्रॅफिक हवालदाराने 1 वाजता गाडीला जॅमर लावला होता. स्फोटकं असलेली ही गाडी दुपारी 12 वाजल्या पासून घटनास्थळी उभी होती. 6 वाजताच्या दरम्यान पोलिसांना संशय आल्याने बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आलं.
या परिसरात अनेक नामांकित लोकांची घरे असल्याने नेमकं कोणत्या उद्देशाने ही गाडी तिथे उभी कऱण्यात आली होती, हे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai police