Home /News /mumbai /

मोठी बातमी : राज्यात अनलॉक 5 च्या गाईडलाईन्स जारी; लोकल व हॉटेल्स केव्हा होणार सुरू?

मोठी बातमी : राज्यात अनलॉक 5 च्या गाईडलाईन्स जारी; लोकल व हॉटेल्स केव्हा होणार सुरू?

राज्यात अनलॉक 5 च्या मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत

    मुंबई, 30 सप्टेंबर : देशभरात अनलॉक 5 ची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अनेक व्यवस्था पूर्वपदावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. अनलॉक 5 च्या मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या असून यानुसार 5 ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंटसह बार सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांना 50 टक्केंची क्षमता अनिवार्य असेल. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील डबेवाल्यांनी लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत मागणी केली जात होती. अखेर त्यांना अनलॉक 5 मध्ये परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याआधी ठरविल्यानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था बंद राहतील. अनेक सेवा सुरू करण्याची परवानही दिली असली तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार असून अन्यथा दंड भरावा लागू शकतो व कारवाई केली जावू शकते. याशिवाय अनलॉक 5 मध्ये चित्रपटगृह, स्वीमिंग पूल सुरू करण्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही. हे ही वाचा-नो मास्क, नो एन्ट्री! महापालिका आयुक्तांकडून कारवाई अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश राज्यात अनलॉक 5 बाबत मार्गदर्शन सूचना जारी मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी पुणे विभागातील लोकल ट्रेन्स होणार सुरू 5 ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंटसह बार होणार सुरू (50 टक्के क्षमता) अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या वाढवणार राज्यांतर्गत लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू करणार
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Mumbai, Mumbai local

    पुढील बातम्या