Home /News /mumbai /

फडणवीसांच्या दौऱ्यानंतर पंकजा मुंडे, विनोद तावडेंसाठी दिल्लीतून मोठी बातमी

फडणवीसांच्या दौऱ्यानंतर पंकजा मुंडे, विनोद तावडेंसाठी दिल्लीतून मोठी बातमी

राज्याच्या राजकारणाबाबत दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.

दिल्ली, 18 जुलै : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सध्या दिल्लीत आहेत. शुक्रवारी दिल्लीत दाखल झालेल्या फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी राज्यातील कोरोनाच्या स्थितीसह राजकारणाबाबतही चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत निवड होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde),आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर पाटील यांना स्थान मिळण्याचं निश्चित झालं आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार आहे, अशीही माहिती आहे. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय खलबतं? अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीस करत असले तरीही या भेटीत कोरोना स्थितीसह राज्यातील राजकारणाबाबतही चर्चा झाली असल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात जवळपास 25 मिनिटे वेगळी चर्चा झाली असून यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवरही खलबतं करण्यात आल्याची माहिती आहे. मुंडे-तावडेंचा राज्यातून पत्ता झाला होता कट भारतीय जनात पक्षाने काही दिवसांपूर्वी राज्यात नवीन कार्यकारणी जाहीर केली होती. त्या कार्यकारणीत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करणा-यांना महत्त्वाचे स्थान नसेल हे पक्षाने स्पष्ट केलं. या यादीवर पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असल्याचंही यादीवर नजर टाकल्यावर स्पष्ट झालं होतं. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या नेत्यांना कार्यकारणीत फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं. पण हे स्थान म्हणजे राज्यातलं केंद्रासारखं हे राज्यातले मार्गदर्शक मंडळ असल्याची चर्चा सुरु झाली होती. तर पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी मिळणार असं तेव्हाच सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारणीत निवड होत असल्याची माहिती आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pankaja munde

पुढील बातम्या