बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, राज्य सरकार पोलीस भरती करण्याच्या तयारीत

बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, राज्य सरकार पोलीस भरती करण्याच्या तयारीत

राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याचीही शक्यता आहे.

कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तब्बल दहा हजार पोलिसांची भरती यातून होऊ शकणार आहे. अनेक पोलिसांना कोविडची लागण झाल्याने पोलिसांचं पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.

पोलीस भरतीबाबत सरकारने उद्या घोषणा केल्यास बेरोजगारीच्या संकटात अनेक तरुणांना दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात फक्त आरोग्य आणि वैद्यकीय विभागात भरती सुरू होती. आर्थिक अडचणींमुळे इतर विभागातील भरती प्रक्रिया सरकारने बंद केली होती. मात्र आता पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता झाल्याने तरुणांना दिलासा मिळाला आहे.

सरकारने याआधी केली होती पोलीस शिपाई भरतीची घोषणा

राज्यातील पोलीस दलामध्ये विविध पदांवर जवळपास 12 हजार 538 पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात जुलै महिन्यात आल्या होत्या. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं.

पोलीस शिपाई गट-क संवर्गातील 2019 या भरती वर्षात रिक्त असलेली 5297 पदे व 2020 या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा मुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण सहा 6726 पदे त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 500 हून अधिक अशी एकूण 12 हजारा 538 पदे भरण्यात येतील, अशी माहिती अनिल देशमुख यांनी तेव्हा दिली होती.

Published by: Akshay Shitole
First published: September 15, 2020, 8:02 PM IST

ताज्या बातम्या