मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BIG NEWS : मुंबईत 'नाईट कर्फ्यू'बाबत घेतला मोठा निर्णय

BIG NEWS : मुंबईत 'नाईट कर्फ्यू'बाबत घेतला मोठा निर्णय

रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आल्यामुळे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र फिरण्यास मनाई आहे. तसं आढळल्यास 1000 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आल्यामुळे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र फिरण्यास मनाई आहे. तसं आढळल्यास 1000 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्यसरकारने रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती.

मुंबई, 6 जानेवारी : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी राज्यसरकारने रात्रीच्या संचारबंदीची (night curfew) घोषणा केली होती. राज्यात कोरोनाची वाढती संख्या आणि नवकोरोनाची भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले होतं. दरम्यान मुंबईत (Mumbai) आजपासून रात्रीची संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. 22 जानेवारी 2020 पासून 5 जानेवारी 2021 पर्यंत पालिका आणि मुंबई पोलिसांनी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. ( Big decision taken regarding night curfew in Mumbai)

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये प्रशासनाकडून शिथिलता आणण्यात आली आणि नागरिकही मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले. अशातच काही दिवसांतच 2021 हे नवं वर्ष सुरू होत असल्याने 31 डिसेंबर रोजी लोकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडू नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला होता.

मुंबई पोलिसांनी रात्र संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबईमध्ये 23 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत रात्रीची संचारबंदी राहणार होती. या संचारबंदीमध्ये वाढ करावी अथवा करू नये यासाठी मुंबई महापालिकेमध्ये एक महत्वपूर्ण बैठक दोन दिवसांपूर्वी पार पडली होती. या बैठकीत रात्र संचारबंदी ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. परंतु ही घोषणा मुंबई पोलिसांच्या वतीने केली जाणार होती. कालपर्यंत ही रात्र संचारबंदी होती आणि आज पासून ती उठवण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे.

हे ही वाचा-कडक सॅल्यूट! आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पाण्यातून खेचून काढलं

राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी होत असल्याने अनेक मोठी दुकाने आणि मॉल्स रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. मात्र सरकारने नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतल्याने आता ही दुकाने 11 पर्यंतच सुरू राहतील असेही सांगण्यात आले होते. 'सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय योग्य असला तरीही या निर्णयामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान होणार आहे,' अशी प्रतिक्रिया फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी दिली होती.

First published:

Tags: Mumbai