CAA आणि NRC विरोधात विराट मोर्चा, आझाद मैदानात प्रचंड गर्दी

CAA आणि NRC विरोधात विराट मोर्चा, आझाद मैदानात प्रचंड गर्दी

मुंबईमध्ये सुद्धा CAA, NRC आणि NRP ला विरोध करण्यासाठी सर्व धर्मियांनी तीव्र विराट मोर्चा काढण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : केंद्र सरकारच्या सीएए आणि एनआरसी या कायद्यांना देशभरातून होत असलेला विरोध अजूनही कायम आहे. रोज कुठे ना कुठे मोर्चे निघत आहेत. आंदोलनं होत होत आहेत. आज मुंबईमध्ये सुद्धा CAA, NRC आणि NRP ला विरोध करण्यासाठी सर्व धर्मियांनी तीव्र विराट मोर्चा काढण्यात आला आहे. आझाद मैदानाl हा मोर्चा काढण्यात आला. जवळपास 67 संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. यामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले आहेत. मोर्चामध्ये तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले आहेत. मात्र या मोर्चामधील महिलांची संख्या लक्षणिय आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात मोठ्या संख्येनं महिला रस्त्यावर उतरल्या आहे.

मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे. नो सीएए, नो एनआरसी आणि नो एनपीआरच्या घोषणा देण्यात येत आहेत. तर 'संविधान बचाव देश बचाव'च्या घोषणांनीही आझाद मैदान आंदोलकांनी दणाणून सोडलं.

सीएए कायद्याच्या विरोधातील काही राजकीय पक्षांचे नेते सुद्धा सहभागी होणार आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रावादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, काँग्रेसचे नेते ऊर्जा मंत्री नितीन राऊतही सहभागी होणार आहेत.

फक्त राजकीय व्यक्तीच नाही तर बॉलिवूडमधल्या काही कलाकारांनीही पाठिंबा दिला आहे. हे कलाकार सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. काही वेळातच स्वरा भास्कर, तापसी पन्नू या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांची संख्या जसा वेळ पुढे जातोय तशी वाढत चालली आहे. त्यामुळे अजुनही मोठ्या संख्येनं लोक या मोर्चात सहभागी होणार असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. तर पुढच्या रविवारी म्हणजे 23 फेब्रुवारीला सुद्धा यापेक्षाही मोठा आणि विराट मोर्चा काढण्याचं आयोजकांचं नियोजन आहे.

वाचा : सामनाच्या जाहिरातीमुळे कोकणात राजकारण पेटलं, शिवसेनेची नेमकी भूमिका काय?

वाचा : मोबाइलवर बोलण्यासाठी मोजावी लागणार अधिक रक्कम, हे आहे कारण

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2020 05:57 PM IST

ताज्या बातम्या