मुंबई, 17 जून: महाराष्ट्रात येत्या काळात मोठी राजकीय उलथापालथ होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाने (Congress Party) स्वबळावर निवडणूक लढवण्याचं म्हटल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. विदर्भातील अनेक मोठे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार (Big leaders of vidarbha to join Congress) असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
माजी मंत्री आणि भाजपचे माजी आमदार डॉ सुनील देशमुख हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं. या संदर्भात मुंबईत पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले, ही घरवापसी आहे आणि जशास तसे अजून उत्तर द्यायचं आहे. विदर्भातील काही बडे नेते काँग्रेस पक्षात राहुल गांधींच्या जन्मदिनी प्रवेश करतील. हा एक ट्रेलर आहे संपूर्ण पिक्चर अद्याप बाकी आहे असंही नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं.
विदर्भातील ते भाजप नेते कोण?
मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला होता. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी केवळ काँग्रेसच नाही तर राष्ट्रवादीतील सुद्धा अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपत प्रवेश केला. मात्र, राज्यात भाजपची सत्ता आलीच नाही. त्यामुळे आता या नेत्यांची पुन्हा घरवापसी होत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, भाजपमध्ये गेलेले आणि आता पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असणारे हे नेते कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मोठी लिस्ट तयार?
काही दिवसांपूर्वी विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या नाना पटोले यांनी म्हटलं होतं की, भाजपमधून अनेक लोक काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत. माझ्याकडे मोठी लिस्ट तयार आहे. नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या. तसेच हे नेते कोण आणि लिस्टमध्ये किती जणांची नावे आहेत? असा सवालही विचारला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.