Home /News /mumbai /

भाजपला मोठं खिंडार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7 नगरसेवकांच्या हाती शिवबंधन

भाजपला मोठं खिंडार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7 नगरसेवकांच्या हाती शिवबंधन

Big jolt to BJP: भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या तब्बल 7 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई, 26 मे: भारतीय जनता पक्षाला (Bhartiya Janata Party) शिवसेनेने (Shiv Sena) आणखी एक मोठा झटका दिला आहे. जळगावातील मुक्ताई नगरपालिकेचे (Muktai Nagar Palika) 7 नगरसेवक (7 BJP Corporators) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. हे सर्वच्या सर्व 7 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. जळगाव महानगरपालिकेनंतर आता मुक्ताई नगरपालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश मुक्ताई नगरपालिकेचे 7 नगरसेवक हे गुलाबराव पाटील यांच्यासह वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या नगरसेवकांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. सहा नगरसेवक हे भाजपचे असून एक नगरसेवक अपक्ष आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांची नावे पियूष महाजन मुकेश वानखेडे संतोष कोळी शबाना अब्दूल अरिफ नुसरत मेहबूब खान बिल्कीज अमानउल्ला खान महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी, काँग्रेसने दिला सूचक इशारा  काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे तब्बल 30 नगरसेवक आपल्या गळाला लावले. भाजपला हा एक मोठा झटका बसला होता. हे नगरसेवक शिवसेनेच्या तंबूत गेल्याने फुटीर नगरसेवकांना व्हीप न बाजवता आल्याने भाजपने कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने भाजपची ही याचिका फेटाळून लावली होती. जळगावच्या या घटनेतून भाजप सावरत ना सावरत तितक्यात आता मुक्ताई नगरपालिकेचे 7 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. उद्या इतर 4 नगरसेवकांचाही प्रवेश शिवसेनेत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुक्ताई नगरपालिकाही भाजपच्या हातातून जाणार असे चित्र निर्माण झाले आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Jalgaon, Shiv sena

पुढील बातम्या