Home /News /mumbai /

BREAKING: नवाब मलिक यांना मोठा झटका, ईडीच्या कारवाई विरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

BREAKING: नवाब मलिक यांना मोठा झटका, ईडीच्या कारवाई विरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

Big jolt for Nawab malik as mumbai hc reject his petition against ed action: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. ईडीच्या कारवाई विरोधात करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 15 मार्च : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering case) अटक करण्यात आली आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली आहे. नवाब मलिकांच्या या याचिकेवर ईडीच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला आणि पीएमएलएचा कायदा लागू होतो असं ईडीने म्हटलं. त्यानंतर उच्च न्यायालयाने नवाब मलिकांच्या वकिलांचा युक्तीवाद फेटाळून लावला. तसेच नवाब मलिकांना जामीनासाठी रितसर अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. वाचा : फडणवीसांचा डाव उलटणार? नवाब मलिकांच्या मुलीचा खळबळजनक गौप्यस्फोट मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली. यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केली होती. नवाब मलिक यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात काही तथ्य नाही मात्र त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. मात्र, ही याचिका आता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. "नवाब मलिकांनी हसीना पारकरला 55 लाख दिले नाहीत, 'ती' एक टायपिंग चूक" नवाब मलिक यांनी हसीना पारकरला (Haseena Parkar) 55 लाख नाही तर 5 लाख रुपये दिले होते. 55 लाख रुपये दिले ती एक टायपिंग चूक होती अशी माहिती काही दिवसांपूर्वी ईडीच्या वकीलांनी न्यायालयात दिली होती. 3 मार्च रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयात ईडीच्या वकीलांनी म्हटलं, नवाब मलिक यांच्या इडी कोठडीची आवश्यकता आहे. नवाब मलिक हे तब्येतीच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल होते. यामुळे त्यांचा जबाब पूर्ण घेता आली नाही तशीच त्यांची पुर्ण चौकशी करता आली नाही. या प्रकरणातील व्यवहार पाहता याशिवाय या प्रकरणात अधिक माहिती समोर येत आहे, आधीच्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळे ट्रान्झॅक्शन नमूद आहेत. हसीना पारकरच स्टेटमेंट, जेलमध्ये असलेल्या दोषींचे स्टेटमेंट, मालकीण असलेली मुनिराचं स्टेटमेंट आहे. या संदर्भात मलिक यांची चौकशी करायची आहे. यावर नवाब मलिक यांचे वकील अ‍ॅड अमित देसाई यांनी म्हटलं, 55 लाख हसीना पारकरला दिल्याचा दावा केला, टेरर फँडिंगचा आरोप केला पण आता मात्र, ईडी सांगत आहे की टाईप करताना चूक झाली आहे. आता रिमांडमध्ये 5 लाख म्हणत आहेत, या चुकीमुळे मलिक यांनी ईडी कोठडीत रहावे लागले आहे, ईडीने नीट गृहपाठ करावा.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Money laundering, Mumbai high court, Nawab malik

पुढील बातम्या