Home /News /mumbai /

मोठी बातमी : राणा दाम्पत्याला झटका, मुंबईतल्या घरातील बांधकाम अनधिकृतच, घरावर चालणार BMC चा हातोडा

मोठी बातमी : राणा दाम्पत्याला झटका, मुंबईतल्या घरातील बांधकाम अनधिकृतच, घरावर चालणार BMC चा हातोडा

Mumbai News: खासदार नवनीत राणा यांच्या मुंबईतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई मनपाने पुन्हा एकदा त्यांना नोटीस बजावली आहे.

    मुंबई, 21 मे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांचा शिवसेनेसोबत वाद असतानाच मुंबई मनपाकडून (BMC) राणा दाम्पत्याला अनधिकृत बांधकाम प्रकरणात नोटीस बजावली. मुंबईतील घरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने मुंबई मनपाला याबाबत आपलं उत्तर दिलं. आता पुन्हा एकदा मुंबई मनपाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावत इशारा दिला आहे. राणा दाम्पत्याचे मुंबईतील खार परिसरात घर आहे. या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी मुंबई मनपाने राणा दाम्पत्याच्या घराची पाहणी सुद्धा केली होती. यानंतर राणा दाम्पत्याने मुंबई मनपाला आपली बाजू मांडत उत्तर दिलं. मात्र, त्यांनी दिलेलं उत्तर अमान्य असल्याचं बीएमसीने म्हटलं आहे. बीएमसीकडून पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला नोटीस बजावण्यात आली आहे. घरात करण्यात आलेल्या बांधकामत नियमांचं उल्लंघन झालं आहे. हे अनधिकृत बांधकाम 7 ते 15 दिवसांत पाडावं नाही तर महानगरपालिका यावर कारवाई करेल असं मुंबई मनपाकडून सांगण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण? नवनीत राणा यांच्या मुंबई खार येथील फ्लॅटमध्ये अनधिकृत  बांधकाम केले असल्याची पालिकेने काही दिवसांपूर्वी नोटीस दिली होती. राणा दाम्पत्य जेलमध्ये असताना पालिकेने दारावर नोटीस लावली होती. 353 अंतर्गत तोडक कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस पालिकेनं राणा दाम्पत्याला बजावली होती. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत रवी राणा रहात असलेल्या सोसायटीच्या पदाधिकारी व उपभोक्ता म्हणून आमदार रवी राणा यांचे नावे नोटीस पाठविली होती. या नोटीसवर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून उत्तर देण्यात आलं. मात्र, हे उत्तर असमादानकारक असल्याचं मुंबई महानगरपालिकेने म्हटलं आहे. त्यानंतर आता पुन्हा बीएमसीने राणा दाम्पत्याला नोटीस बाजवत अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BMC, Mumbai, Navneet Rana, Ravi rana

    पुढील बातम्या