मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

लॉकडाऊन इतिहासजमा व्हायच्या दिवशीच राज्यातून आली धक्कादायक उच्चांकी आकडेवारी

लॉकडाऊन इतिहासजमा व्हायच्या दिवशीच राज्यातून आली धक्कादायक उच्चांकी आकडेवारी

मुंबईतल्या 24 मधल्या 4 वॉर्डांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर हा 100 दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे. तर 2 वॉर्डांमध्ये तो 90 दिवसांवर गेला आहे.

मुंबईतल्या 24 मधल्या 4 वॉर्डांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर हा 100 दिवसांपेक्षाही जास्त झाला आहे. तर 2 वॉर्डांमध्ये तो 90 दिवसांवर गेला आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 281 वर पोहोचली आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 29 ऑगस्ट : लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारने राज्यांना अटी घालून दिलेल्या असतानाच राज्यातून कोरोना रुग्णांबाबत (Coronavirus) धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात आज एकाच दिवशी तब्बल 16 हजार 867 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 281 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळे 328 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11,541 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात दरदिवशी कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली विक्रमी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. त्यातच आता केंद्राच्या मदतीशिवाय राज्यांना लॉकडाऊन जाहीर करणं शक्य होणार नसल्याने कोरोनाला रोखणार तरी कसं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनलॉकबाबत काय आहे केंद्र सरकारचा नवा निर्णय? येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल होतील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल. तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठीही वेगळी परवानगीची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स सांगतात. या नव्या नियमांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील, असं सांगण्यात आलं आहे. मेट्रो मात्र 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. शाळा बंद असल्या तरी अनलॉक 4.0 मध्ये नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा शाळेत जायची परवानगी देण्यात आली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता E pass किंवा परवानगीची आवश्यकता नाही.
First published:

Tags: Coronavirus, Lockdown

पुढील बातम्या