Amazonवर Grand Gaming सेल, TV, Laptopवर मिळणार मोठी सुट

Amazonवर Grand Gaming सेल, TV, Laptopवर मिळणार मोठी सुट

त्याचबरोबर 8,000 रुपयांच्या खरेदीवर 1500 रुपयांची सुट देण्यात आली आहे. सॅमसंगचा एचडी, एलईडी स्मार्ट टीव्ही 53,999 रुपयांमध्ये मिळेल.

  • Share this:

नवी दिल्ली 20 जुलै: Applesचे फोन्स आणि इतर वस्तूंवर सेल सुरू केल्यानंतर Amazonने आणखी एका सेलची ऑफर दिली आहे. हा Grand Gaming Days Sale असून 20 जुलैच्या रात्री 12 पासून त्याची सुरुवात होणार असून 23 जुलैच्या रात्री 12 पर्यंत तो चालणार आहे. यात गेम खेळणाऱ्यांसाठी चांगली ऑफर दिली असून त्या प्रॉडक्ट्सवर मोठी सुट (Discounts) देण्यात आली आहे.

लॅपटॉप (Laptop), मॉनिटर (Monitors),  हेडफोन्स (Headphones)वर घसघशीत सुट देण्यात आली आहे. मोठ्या स्क्रिन असणाऱ्या स्मार्ट स्मार्ट TVवर तर 40 टक्क्यांपर्यंत सुट देण्यात आली आहे.

या सेलमध्ये लिनोवो (Lenovo), एसर (Acer), आसुस (ASUS), एलजी (LG), एचपी (HP) आणि सोनी (Sony) च्या स्मार्ट टीव्हीवरही (Smart TV) ऑफर देण्यात आली आहे.

त्याचबरोबर 8,000 रुपयांच्या खरेदीवर 1500 रुपयांची सुट देण्यात आली आहे. सॅमसंगचा एचडी, एलईडी स्मार्ट टीव्ही 53,999 रुपयांमध्ये मिळेल.

हे वाचा -  Good News: कोरोनावरच्या Oxfordच्या लशीचे परिणाम जाहीर, सर्वात मोठं यश

लिनोवोचा Legion Y540 लॅपटॉप 9th जनरेशन कोअर i7 प्रोसेसर आणि NVIDIA GeForce GTX 1650 4 GB  या सेलमध्ये 78,990 रुपयांना खरेदी करता येईल. Acerच्या Nitro 7, 9th Gen, Core i7 लॅपटॉपवरही सुट आहे. LG चा 24 इंचांचा गेमिंग मॉनिटर 9,722 रुपयांना उपलब्‍ध आहे.

विविध प्रकारे पेमेंटंची सुविधाही त्यात देण्यात आली असून क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा वापर करूनही खरेदी करता येणार आहे. या आधी Amazonने Applesच्या प्रॉडक्ट्सचा सेल सुरू केला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 20, 2020, 11:24 PM IST

ताज्या बातम्या