COVID19 : ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय, TMCबसेसचं रुपांतर अ‍ॅम्बुलन्समध्ये

COVID19 : ठाणे महापालिकेचा मोठा निर्णय, TMCबसेसचं रुपांतर अ‍ॅम्बुलन्समध्ये

ठाणे महानगर पालिका आणि रुगणालये यांच्या अधिपत्यात या रुग्णवाहिका असून रुग्णवाहिकांच्या मागणी नुसार त्यांचा पुरवठा केला जाईल.

  • Share this:

ठाणे 28 मे: ठाण्यात वेळेत रुग्ण वाहिका न मिळाल्याने अनेक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.  यामुळे ठाणेकरांमध्ये आरोग्य सुविधां बद्दल संताप वाढत चालला होता. कारण रोज ठाण्यात किमान १०० ते १५० करोना बाधित रुग्ण आढळत असून एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णवाहिकांची उपलब्धता ही नसल्याने करोना बाधित रुग्णांचा वेळेत उपचारा अभावी मृत्यू झाल्याच्या काही घटना आढळून आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने मोठा निर्णय घेतला असून परिवहन बसेसचं रुपांतर अ‍ॅम्बुलन्समध्ये करण्यात आलं.

या परिस्थिती नुसार ठाणे महानगर पालिकेने एक मोठा निर्णय घेतला असून ठाण्यातील पालिकेच्या मिनी बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आले असेल मोठ्या प्रमाणात आज या बसेस ठाणे करांच्या सेवेकरता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगर पालिका आणि रुगणालये यांच्या अधिपत्यात या रुग्णवाहिका असून रुग्णवाहिकांच्या मागणी नुसार त्यांचा पुरवठा केला जाईल आणि गरज भासल्यास आणखी बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात येईल असं ही ठाणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

या बसेसची पाहणी आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि आणखी बसेस उपलब्ध करून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं.

 

First published: May 28, 2020, 10:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading