BREAKING : मुंबईतल्या शाळांबद्दल मोठा निर्णय; आणखी काही काळ बंदच राहणार

BREAKING : मुंबईतल्या शाळांबद्दल मोठा निर्णय; आणखी काही काळ बंदच राहणार

कोविड- 19 आणि दरम्यान असलेल्या सुट्यांमुळे (vocations) अनेक ठिकाणी गर्दी (Crowd) होऊ शकते. यामुळे शाळा सुरू (School open) करू नये अशी विनंती पालिकेच्या शिक्षण विभागाने आयुक्तांकडे केली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona pedemic) आणि त्यानंतर आठ महिन्यांचं देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) यामुळे देशातील शाळा (Schools) बंदच आहेत. कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध (Unlock) हटवल्यानंतर देशातील कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्याही कमी होताना दिसली. यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरू होतील असं वाटलं होतं. पण धोका अजून टळलेला नाही. कारण ब्रिटनमध्ये (Britain) उद्भवलेला नवीन कोरोना विषाणूचा प्रसार (new Corona virus) वेगात होताना  दिसत आहे. त्यामुळे शाळा सुरू करायच्या की नाहीत? याबाबत राज्य सरकारची (State government) भूमिका तळ्यात मळ्यात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने 15 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातलं पत्र त्यांनी आयुक्तांना लिहीलं आहे

यापूर्वीच राज्यात शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांत नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत आणि काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. राज्यसरकारने यापूर्वीच राज्यात शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले असले तरी मुंबई महानगरपालिकेने 31 डिसेंबर पर्यंत मुंबईतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पुढील वर्षी बोर्डाची परीक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे.

कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन आणि नवीन वर्ष या दोन कारणांमुळे कोरोना प्रादुर्भावाचा वाढता धोका लक्षात घेत शाळा उघडण्यासाठी आणखी विलंब होणार आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थांची गर्दी होऊ शकते. त्यामुळे त्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक आहे. यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. तसंच 15 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी या पत्रात केली आहे.

Published by: News18 Desk
First published: December 29, 2020, 9:11 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या