मुंबई, 10 नोव्हेंबर : मुंबई (Mumbai) महापालिकेत (BMC) वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय (Big Decision ) घेण्यात आला आहे. वाढत्या नागरिकरणामुळे (Mumbai Population) नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा देता याव्यात यासाठी मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. याबाबतची माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ( Big changes in Mumbai Municipal Corporation increase in the number of corporators )
227 वरून आता 236 वॉर्ड रचना करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. वॉर्ड फेर रचना अध्यादेश काढल्या नंतर होईल. मुंबई महापालिकेत आता 9 वार्ड वाढल्यानंतर नगरसेवकांची संख्या 9 ने वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान दुसरीकडे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं दिसून येत आहे. त्यांच्या मागण्यावर काय निर्णय घेणार हे लवकरच समोर येईल.
बातमी अपडेट होत आहे..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.