Home /News /mumbai /

मोठी बातमी ! मुंबईसह ठाण्यातील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित, दादरमध्ये राज्यपालांच्या कार्यक्रमात बत्ती गुल

मोठी बातमी ! मुंबईसह ठाण्यातील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित, दादरमध्ये राज्यपालांच्या कार्यक्रमात बत्ती गुल

पडघा येथील महापारेषणच्या 400 KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे पडघा ते पाल 220 KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

    मुंबई, 26 एप्रिल : मुंबईतील दादर परिसरात सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित (power outage in Mumbai) झाला. याच परिसरात आज स्काऊट्स आणि गाईड्स राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित कऱण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याहस्ते हा पुरस्कार समारंभ होत आहे. मात्र, या कार्यक्रमापूर्वीच वीज पुरवठा खंडित झाला. साधारणत: अर्ध्यातासाने हा वीज पुरवठा आता सुरळीत झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील दादर, वांद्रे, माहिम आणि सांताक्रुझ परिसरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. काही तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित झाला. अचानक वीज गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वीज पुरवढा खंडित झाल्याने बेस्ट कडून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि वीज पुरवठा सुरळीत केला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास कळवा-पडघा येथील 400 केव्हीची लाईन ट्रिप झाली. याचा परिणाम म्हणजे मुंबई, ठाणे परिसरात होणाऱ्या वीज पुरवठ्यावर झाला. त्यानंतर तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आणि वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. जवळपास अर्ध्या तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती समोर आली आहे. वाचा : नवनीत राणांसोबत जेलमध्ये दुर्व्यवहार, महिला आयोगाने चौकशी करावी, BJPची मागणी अनेक शहरांचा विद्युत पुरवठा खंडित पडघा येथील महापारेषणच्या 400 KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे पडघा ते पाल 220 KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या डोंबिवली, कल्याणचा काही भाग, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. महापारेषणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या भागाचा वीजपुरवठा तातडीने सुरू व्हावा यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. साधारणतः अर्धा ते पाऊण तासात वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोळशाच्या संकटामुळे वीज निर्मिती घटली देशातील कोळसा संकटाचा (Coal Crisis) गंभीर परिणाम महाराष्ट्रातील 7 वीज प्रकल्पांवरही (electricity plant) झाला आहे. राज्यातील अनेक वीज केंद्रांमध्ये कमी कोळसा शिल्लक आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने होत नाही. मात्र, केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी कोळशाचा तुटवडा नसल्याचं सांगितलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Electricity cut, Governor bhagat singh, Mumbai

    पुढील बातम्या