मुंबई काँग्रेसला मोठा धक्का : अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या काँग्रेस प्रवेशापेक्षाही मोठी बातमी

मुंबई काँग्रेसमधले प्रॉब्लेम्स आता काही गुपित राहिलेलं नाही, असं सांगत काँग्रेसचे खासदार आणि राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडचा भाग राहिलेले मिलिंद देवरा आपण कदाचित लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं धक्कादायक विधान केलं.

News18 Lokmat | Updated On: Feb 5, 2019 04:23 PM IST

मुंबई काँग्रेसला मोठा धक्का : अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या काँग्रेस प्रवेशापेक्षाही मोठी बातमी

विनया देशपांडे

मुंबई, 5 फेब्रुवारी : मुंबई काँग्रेसमधले प्रॉब्लेम्स आता काही गुपित राहिलेलं नाही, असं सांगत काँग्रेसचे खासदार आणि राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडचा भाग राहिलेले मिलिंद देवरा आपण कदाचित लोकसभा निवडणूक लढणार नाही, असं धक्कादायक विधान केलं.

गेले काही महिने मुंबई काँग्रेसमध्ये वाद सुरू आहेत. याचा पहिला बळी खासदार मिलिंद देवरा यांच्या रूपात गेला असं म्हणता येईल. विशेष म्हणजे एकीकडे टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाची घोषणा सुरू असतानाच मिलिंद देवरांच्या नाराजीची बातमी समोर आली आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये असलेले वाद जगजाहीर आहेत हे खरं. लोकसभेच्या जागावाटपावरून पक्षात मतभेद आहेत. अनेक काँग्रेस नेते एकाच जागेसाठी आग्रह धरत असल्याने गेल्या आठवड्यात झालेल्या पक्षाच्या संसदीय समितीची बैठक कुठल्या उमेदवाराच्या निश्चितीशिवायच संपली.

मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यामध्ये मुंबईच्या शहरप्रमुख पदावरून वाद होते. शेवटी निरुपम यांनी बाजी मारत मुंबईचं शहरप्रमुखपद पटकावलं. त्यानंतर गेले काही दिवस लोकसभेच्या जागा वाटपावरून दोघांमध्ये वाद असल्याचं बोललं जात आहे.

Loading...

मुंबई पश्चिमेच्या जागेवरच निवडणूक लढवण्यावर संजय निरुपम हटून बसले आहेत आणि त्यांना देऊ केलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते तयार नाहीत, अशी चर्चा आहे.

या मतभेदांमुळे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा कदाचित नसेल, असं देवरा News18शी बोलताना म्हणाले. आपण याबद्दल पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना कळवलं आहे. "मुंबई काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीचं मला वाईट वाटतंय. आज अनेक काँग्रेस नेते घरी बसून आहेत. त्यांना का डावललं जात आहे आणि त्यांना आपल्याला वगळलं जात असल्याची भावना का आहे याविषयी विचारायला हवं", असं देवरा म्हणाले.

"मला बाह्या सरसावून हमरीतुमरीवर येणं मान्य नाही. असे वाद काँग्रेसमध्ये होत नाहीत. याबद्दल आता पक्षाचे वरीष्ठच निर्णय घेतील. त्यांन सगळं कळवलं आहे आणि माझ्या भावनाही पोहोचवल्या आहेत", असं 42 वर्षीय माजी खासदार मिलिंद देवरा म्हणाले.

मिलिंद देवरा हे माजी खासदार राहिले असून दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते. 2004च्या निवडणुकीत निवडून आलेले ते सर्वांत तरुण खासदार होते.काँग्रेसप्रणित सरकारमध्ये ते माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री तसंच जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून कारभार पाहात होते. दिवंगत काँग्रेस नेते मुरली देवरा यांच्यानंतर दक्षिण मुंबई मतदारसंघाची मदार काँग्रेसने मिलिंद यांच्यावर सोपवली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2019 04:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...