लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून महारक्तदान शिबीर, नौदलाच्या ३०० जवानांचं रक्तदान

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून महारक्तदान शिबीर, नौदलाच्या ३०० जवानांचं रक्तदान

या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास १५०० हून अधिक रक्तदात्यांनी केलेलं रक्तदान संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते, तात्काळ जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असणाऱ्या आर्मी जवानांच्या मेडिकल कँम्पमध्ये पाठवण्यात येणार आहे.

  • Share this:

उदय जाधव,मुंबई, 06 आॅगस्ट : आज लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने महारक्तदान शिबीर आयोजित केलंय. सकाळी ६ वाजताच या रक्तदान शिबिराला सुरुवात झालीये. ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू रहाणार आहे. सर्वात आधी मंडळातील कार्यकर्ते आणि नौदलाचे ३०० हून अधिक जवानांनी रक्तदान केलंय. त्यानंतर नोंदणीकृत रक्तदाते आता रक्तदान करत आहेत.

या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास १५०० हून अधिक रक्तदात्यांनी केलेलं रक्तदान संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते, तात्काळ जम्मू-काश्मिरमध्ये तैनात असणाऱ्या आर्मी जवानांच्या मेडिकल कँम्पमध्ये पाठवण्यात येणार आहे. यावेळी नौदलाचे रिअर ॲडमिरल संजय महेंद्रू यांनी देखील आपल्या जवानांसोबत रक्तदान केलं. यावेळी त्यांनी जवानांनी आणि मुंबईकरांनी दान केलेलं रक्त एअरफोर्सच्या विमानाने तात्काळ जम्मू-काश्मिरला नेणार असल्याचं सांगितलं.तसेच लालबागच्या राजा मंडळाने सुरू केलेल्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुकही केलं.

याच रक्तदान शिबिरात रक्तदान केल्यानंतर अवयव दानासाठीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. 'मरावे परि अवयव रुपी उरावे' अशीच भावना यावेळी दात्यांची बोलून दाखवली. या रक्तदान शिबिराला मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील रक्तपेढ्यांनाही पुरवठा केला जाणार असल्याची माहिती, लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिलीय.

सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या रक्तदान शिबीरात मुंबई महापालिका आणि जे जे ग्रुप आॅफ हाॅस्पिटलमधील डाॅक्टरांची टीम आणि मंडळाचे ३००० कार्यकर्ते कार्यरत आहेत.

First published: August 6, 2017, 12:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading