मुंबईत सायकल ट्रॅकचा उद्घाटनाच्या दिवशीच फज्जा; ट्रॅकवर चारचाकी वाहनांचं अतिक्रमण

मुंबईत सायकल ट्रॅकचा उद्घाटनाच्या दिवशीच फज्जा; ट्रॅकवर चारचाकी वाहनांचं अतिक्रमण

उद्घाटनानंतर अवघ्या काही वेळातच या मार्गावर चारचाकी वाहनांनी अतिक्रमण केलं होतं.

  • Share this:

03 डिसेंबर: मुंबई महापालिकेनं मोठ्या हौशीनं सायकल ट्रॅक बनवला, मात्र ज्या दिवशी उद्घाटन झालं त्याचं दिवशी या सायकल ट्रॅकचा पुरता फज्जा उडाला. उद्घाटनानंतर अवघ्या काही वेळातच या मार्गावर चारचाकी वाहनांनी अतिक्रमण केलं होतं.

महापालिकेनं एअर इंडिया ते गिरगावपर्यंत पाच किलोमीटरचा सायकल ट्रॅक सुरू केला. पण नियोजनाअभावी या चांगल्या योजनेचा फज्जा उडाला. सायकल ट्रॅकसाठी लावण्यात आलेले डिव्हायडर वाहनचालकांनी तोडून टाकले. तर काही ठिकाणी सायकल ट्रॅकवर कार पार्क करण्यात आल्या होत्या.

मुंबई महापालिकेनं सायकलप्रेमींसाठी स्वतंत्र सायकल ट्रॅक बनवला खरा, पण नियोजना अभावी उद्घाटन झाल्याबरोबर या सायकल ट्रॅक वरुन चारचाकी वाहनांनी अतिक्रमण केलं. याचबरोबर यासाठी लावण्यात आलेले तात्पुरते डिव्हायडर देखील वाहनचालकांनी तोडून टाकलेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2017 06:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading