मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /वसई विरारमध्ये बविआ, सेनेला दे धक्का; भूषण किणी यांचा भाजप प्रवेश

वसई विरारमध्ये बविआ, सेनेला दे धक्का; भूषण किणी यांचा भाजप प्रवेश

वसई-विरार महानगरपालिकेचे पडघम वाजू लागल्याने भाजपने आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे

वसई-विरार महानगरपालिकेचे पडघम वाजू लागल्याने भाजपने आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे

वसई-विरार महानगरपालिकेचे पडघम वाजू लागल्याने भाजपने आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे

नालासोपारा, 29 मार्च : वसई-विरार महानगरपालिकेचे पडघम वाजू लागल्याने भाजपने आपली मोट बांधण्यास सुरुवात केली असून बहुजन विकास आघाडीचे शिरसाड ग्रामपंचायतीचे 10 वर्षे सरपंच पद भूषवलेले व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी भूषण किणी यांनी व काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने भाजपने बहुजन आणि सेनेचे बुरुज ढासळण्यास सुरुवात करून बविआ व सेनेला धक्का दिला आहे.

वसई विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी वसई-विरारचा दौरा केला. सहप्रभारी जयप्रकाश ठाकूर, भरत राजपूत आणि जिल्हाध्यक्ष राजन नाईक, प्रवीण गावडे, राजू म्हात्रे, मनोज बारोट, महेंद्र पाटील, माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या उपस्थितीत नालासोपारा येथील बालाजी बँक्वेट हॉलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार लाड यांनी बहुजन विकास आघाडीचे नाव न घेता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले की, आजही भाजपला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. निवडणूक कार्यालये बंद करा म्हणून धमक्या दिल्या जात आहेत. शिवसेनेबरोबरच बहुजन विकास आघाडीनेसुद्धा आमच्या धडाडीचा धसका घेतला आहे. त्याद्वारे दहशत निर्माण करणे आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे.

आम्ही वसई-विरारच्या विकासासाठी मैदानात उतरलो आहोत. लोकांचे प्रश्न घेवून लवकरच आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत. जिल्हाधिकाऱ्याकडे रस्त्यांचे प्रश्न मांडणार आहोत. नायगाव आणि भाईंदरला जोडणारा पूल मुद्दाम बंद पाडला गेला आहे. त्यातून त्यांना स्वतःच्या जमिनीच्या व्यवहारातील हित साधायचे आहे. येथील रस्ते अविकसित आहेत. पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे वसई विरारमध्ये गुंडशाही, खंडणी, वसुली, महिलावरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, असाही आरोप केला. मच्छिमार बांधवांसाठी मच्छी सुकवणे, जाळी पसरवणे यांसाठी राखीव असलेल्या 40 एकर भूखंडावर शेरू नावाच्या गुंडाने कब्जा केला आहे. हा शेरू वाघे मुळचा बांग्लादेशी असून तो नाव बदलून कोळी बांधवांच्या जमिनीवर कब्जा करून राहतो आहे. मात्र त्याची दखल घेण्यास कोणीच तयार नाही. त्याशिवाय 110 राखीव भूखंडांपैकी 26 भूखंडांवर कोणी अतिक्रमण केले आहे, त्यांचा बाप कोण, ही अतिक्रमणे हटवणार की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे येथील जनतेला देण्याची वेळ आली आहे. आम्हाला कोणाच्या कुबड्यांची गरज नसून कोणाशीही युती करणार नाही आमच्याकडे 115 जागांसाठी 210 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले असून स्वबळावर सर्वच्या सर्व म्हणजे 115 जागा लढवणार आहोत असे आमदार लाड यांनी सांगितले आहे.

First published:

Tags: BJP, Nalasopara