मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाच्या कोनशीलाचा समारंभ; निमंत्रण नसल्यानं शिवसेना दाखवणार काळे झेंडे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कोनशीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बसवण्यात येणार आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2018 10:46 AM IST

मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाच्या कोनशीलाचा समारंभ; निमंत्रण नसल्यानं शिवसेना दाखवणार काळे झेंडे

18 फेब्रुवारी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कोनशीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बसवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज शिष्टाचारानुसार स्थानिक शिवसेना खासदार राजन विचारे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही आहे. त्यामुळे आज होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना काळे झेंडे दाखवून निदर्शनं करणार असल्याचं शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे भाजपने नेहमीप्रमाणे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेला दूर ठेवलं अशी चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पण या सगळ्यात नवी मुंबईकरांना प्रतिक्षा आणि आनंद आहे तो विमानतळाचा. लवकरात लवकर विमानतळ तयार होऊन नवी मुंबईकरांचा प्रवास सोपा होणार हे नक्की.

कसं असेल नवी मुंबई विमानतळ

- 11.4 चौ. किमी क्षेत्रफळ

- 4.5 किमीच्या दोन समांतर धावपट्ट्या

Loading...

- 2.5 लाख चौ. मीटर क्षेत्रफळाचं प्रवासी टर्मिनल

- 1 लाख चौ. मीटरचं गुड्स टर्मिनल

- वर्षाला 5-5.50 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता

- अंदाजे खर्च - 3.2-4 हजार कोटी रु.

- एअरबस A380, बोईंग 787 ही अजस्र विमानंही लँड होऊ शकणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2018 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...