भुजबळांची 'दुसरी इनिंग', भायखळ्यात घेणार सोमवारी सभा

भुजबळांची 'दुसरी इनिंग', भायखळ्यात घेणार सोमवारी सभा

भुजबळांनी 40 वर्षांपूर्वी ज्या भायखळा मंडईतून सुरूवात केली होती. त्या मंडईत सोमवारी हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर मेळाव्यात आपली भूमिका मांडतील.

  • Share this:

मुंबई, 05 मे : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळालाय. सोमवारी भुजबळ जेलबाहेर येणार आहे. आपल्या राजकारणाला ज्या भायखळ्यातून सुरुवात केली होती तिथूनच भुजबळ आपली दुसरी इनिंग सुरू करणार आहे.

छगन भुजबळ यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर आज केईएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. यावेळी त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. आता पुन्हा एकदा नव्यानं इनिंग सुरू करणार असल्याचे संकेतही छगन भुजबळांनी दिले आहेत. आज राष्ट्रवादीचे काही नेते त्यांना भेटले त्यावेळी भाऊक झालेल्या नेत्यांना त्यांनी पुढच्या काळात अधिक जोमानं काम करूया असं सांगितलंय.

भुजबळांनी 40 वर्षांपूर्वी ज्या भायखळा मंडईतून सुरूवात केली होती. त्या मंडईत सोमवारी हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर मेळाव्यात आपली भूमिका मांडतील. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही या मेळाव्याची जोरदार तयारी केलीये.

या मेळाव्यात भाषण केल्यानंतर ते संध्याकाळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतील. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते घरी येतील. त्यावेळी काही कार्यकर्त्यांना भेटतील. मंगळवारी घरी आराम केल्यानंतर बुधवारी लिलावती रूग्णालयात त्यांच छोटं आॅपरेशन करण्यात येईल. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मग ते मैदानात उतरतील.

First published: May 5, 2018, 7:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading