भुजबळांचा नऊ वेळा जामिनासाठी अर्ज, अखेर आज मंजूर !

भुजबळांचा नऊ वेळा जामिनासाठी अर्ज, अखेर आज मंजूर !

14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळ यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने छगन भुजबळ यांना 11 तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती.

  • Share this:

मुंबई, 04 मे : महाराष्ट्र आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला. तब्बल दोन वर्ष भुजबळांना तुरुंगात राहावं लागलं. या काळात भुजबळांनी नऊ वेळा जामिनासाठी अर्ज केला होता.

14 मार्च 2016 रोजी छगन भुजबळ यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने छगन भुजबळ यांना 11 तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी भुजबळांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने जामीन फेटाळून न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर भुजबळांची तब्येत खालावली त्यामुळे भुजबळांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला. पण हायकोर्टाने फेटाळून लावला. उपचारासाठी भुजबळांना जेजे आणि बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. त्यानंतर प्रकृतीत चढउतार सुरूच होते. त्यामुळे भुजबळांना जेजे रुग्णालयात उपचार आणि पुन्हा तुरुंगात असा प्रवास सुरू होता.

अलीकडेच  सुप्रीम कोर्टाने मनी लाँड्रिंग कायद्यातील कलम ४५ (१) मध्ये केलेल्या बदला केला. याचा आधार घेत  ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नाही, असा दावा भुजबळांनी करत पुन्हा जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण तिथेही पदरात निराशाच आली. त्यानंतर अखेरीस भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला. कोर्टाने ईडी आणि भुजबळांकडून युक्तिवाद ऐकून घेतला आणि 4 मे रोजी भुजबळांना जामीन मंजूर केला.

First published: May 4, 2018, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading