छगन भुजबळांची अंजली दमानियांना 50 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस

छगन भुजबळांची अंजली दमानियांना 50 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस

छगन भुजबळ यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध 50 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे

  • Share this:

18 मे : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध 50 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे. भुजबळांनी आपल्या वकिलामार्फत ही नोटीस पाठवलीये.

आॅर्थर रोड जेलमध्ये छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. एवढंच नाहीतर जेलमध्ये भुजबळांना दारू आणि नाॅनव्हेज जेवण सुद्धा मिळत असल्याचा आरोप केला होता.

दमानियांच्या या आरोपांचं भुजबळांनी जेलमधून पत्र लिहून खंडन केलं होतं. तसंच कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज भुजबळांनी आपल्या वकिलाच्या मार्फत अंजली दमानियांनी 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीची नोटीस बजावलीये. तसंच दमानियांना 48 तासांत लेखी माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल अशा इशाराही भुजबळांनी दिलाय.

First published: May 18, 2017, 10:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading