भुजबळांना जामीन, किरीट सोमय्यांचं 'नो कमेंट'

भुजबळांना जामीन, किरीट सोमय्यांचं 'नो कमेंट'

  • Share this:

मुंबई, 04 मे : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळालाय. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजप आणि सेनेचे नेते मौन बाळगुण आहे.

आरोप दाखल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात रान उठवलं होतं. किरीट सोमय्या आणि त्यांचे सहकारी भुजबळांविरोधात टीकेची तोफ डागण्यात अग्रेसर होते. मात्र आज भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर भाजप नेत्यांनी मौन बाळगलंय.

त्यांच्यासह शिवसेनेचे नेते देखील भुजबळांच्या जामिनावर मूग गिळून गप्प आहे. भाजप आणि शिवसेना नेत्यांनी मौन बाळगल्यामुळं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय..

First published: May 4, 2018, 11:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading