मुंबईत भोजपुरी गायकाची निर्घृण हत्या, एक वर्षापूर्वी झालं होतं लग्न

मुंबईत भोजपुरी गायकाची निर्घृण हत्या, एक वर्षापूर्वी झालं होतं लग्न

तेजकुमार मागील चार वर्षांपासून मुंबईत राहत आहे. तेजकुमार हा मूळचा बिहारचा होता. त्याने आतापर्यंत अनेक गाणीही भोजपुरीमधून गायली आहेत. तेजकुमारचे अनेक गाण्याचे अल्बमही प्रसिद्ध झाले आहेत. एक वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते.

  • Share this:

मुंबई, 5 ऑगस्ट- मुंबईत गर्दुल्ल्यांकडून एका भोजपुरी गायकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तेजकुमार राम (वय-22) असे हत्या झालेल्या गायकाचे नाव आहे.ही घटना 3 ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी उड्डाणपुलाच्या सबवेमध्ये घडली.

डिलिव्हरी बॉय म्हणून करत होता काम...

विक्रोळी येथील कन्नमवार नगरमध्ये असलेल्या रेड चिली हॉटेलमध्ये तेजकुमार डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो हॉटेलमध्येच राहत होता. शनिवारी रात्री सायकलवरुन पार्सल देऊन हॉटेलकडे परतत असताना पूर्व द्रुतगती मार्ग येथील उड्डाणपुलाखाली दोन ते तीन जणांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ही हत्या चोरीच्या हेतूने झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. विक्रोळी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.

विक्रोळीत झालेल्या या हत्येमुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

तेजकुमार मागील चार वर्षांपासून मुंबईत राहत आहे. तेजकुमार हा मूळचा बिहारचा होता. त्याने आतापर्यंत अनेक गाणीही भोजपुरीमधून गायली आहेत. तेजकुमारचे अनेक गाण्याचे अल्बमही प्रसिद्ध झाले आहेत. एक वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. यापूर्वीही तेजकुमारवर अशा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, असं त्याच्या मित्र मंडळीने सांगितले.

मित्राचीच बायको नेली पळवून.. जाब विचारल्याच्या रागातून एकाची हत्या

एकाने मित्राची बायको पळवून नेल्यावरून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्वेकडील वाकण पाडा येथे ही घटना घडली आहे. जावेद सरवर (वय-20) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. नालासोपारा पूर्वेकडील वाकण पाडा येथे मित्राच्या बायकोला पळवून नेणाऱ्यास जाब विचारल्याच्या रागातून एकाची हत्या करण्यात आली. जाब विचारणारा न भेटल्याने त्याच्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत जावेद सरवर हा बिस्मिल्ला हॉटेलच्या बाहेर पान टपरी चालवत होता.

जावेदचा भाऊ नावेद याचा मित्र मुश्ताक याच्या बायकोला उस्मान याने पळवून नेले. त्याचा जाब नावेदने विचारला होता. त्याचा राग मनात धरून काही लोक नावेदला मारण्यासाठी आले होते. मात्र, तो न भेटल्याने त्याचा भाऊ जावेदवर मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

असा असेल भारताचा नवा नकाशा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 09:15 PM IST

ताज्या बातम्या