• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • सोनसाखळी चोरट्याच्या अंगावर घातली दुचाकी; भिवंडीतील बेदम मारहाणीचा VIDEO व्हायरल

सोनसाखळी चोरट्याच्या अंगावर घातली दुचाकी; भिवंडीतील बेदम मारहाणीचा VIDEO व्हायरल

नागरिकांनी चोराचा पाठलाग केला व त्याला पकडून मारहाण केली.

  • Share this:
भिवंडी, 23 सप्टेंबर : भिवंडी शहरातील (Bhiwandi Crime News) कोंबडपाडा परिसरात सोनसाखळी चोराला पकडून नागरिकांकडून बेदम मारहाणीची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 30 वर्षांच्या सलमान पठाण या चोरट्यास नागरिकांनी खूप मारहाण केली. अगदी सायकलही त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. (Bhiwandi : thief who stole a gold chain was beaten by citizens video viral) सोनसाखळी चोर शहरातील कोंबडपाडा परिसरात  एक महिला गणपती मंदिरा शेजाराहून जात असताना दुचाकीवर आलेल्या सोनसाखळी चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढून पळून जात असताना महिलेने केलेल्या आरडाओरडा मुळे स्थानिकांनी चोरट्याचा पाठलाग केला आणि वंजारपट्टीच्या दिशेने पळून जाणाऱ्या चोराला पकडलं. सोनसाखळी चोर दुचाकीवरून पडल्याने नागरीकांच्या तावडीत सापडला. हे ही वाचा-Beed:वाढदिवसाला बोलावून पोत्यात गुंडाळून पेटवलं; 19 वर्षीय तरुणाची भयावह अवस्था त्यानंतर सर्व नागरिकांनी मिळून त्याला चांगलाच चोप दिला. एकाने तर सायकल चोराच्या अंगावर घातली. जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला ठाणे येथील रुग्णालयात (Thane Hospital) उपचारासाठी पाठवलं असून निजामपूरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वेळीच चोराला पकडल्यामुळे महिलेची सोनसाखळी सापडली आहे. मात्र नागरिकांकडून झालेल्या मारहाणीत चोर जखमी झाला आहे. कोरोना काळात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे बेरोजगारी वाढली. अशावेळी हाताला काम नसल्यामुळे अनेक जण गुन्हेगारीच्या मार्गाला लागल्याचं दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे आधीच नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. डोंबिवलीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत 23 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास मनपाडा पोलीस करत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published: