भिंवडीत काँग्रेसची एक हाती सत्ता

भिंवडी महापालिकेत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत एक हाकी सत्ता राखलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 26, 2017 04:00 PM IST

भिंवडीत काँग्रेसची एक हाती सत्ता

26 मे  : स्थानिक निवडणुकीत अपयशाला सामोरं जाणाऱ्या काँग्रेसला भिंवडीकरांनी साथ दिली. भिंवडी महापालिकेत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत एक हाकी सत्ता राखलीये.

भिंवडी-निजामपूर महापालिकेच्या 90 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत आपला गड कायम राखलाय. काँग्रेस सर्वाधिक 47 जागा जिंकल्यात. या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजुने कौल येईल अशी चिन्ह होती. पण, मतदारांनी सेनेला संधी दिली नाही.

मागील निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 25 जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसच्या जागेत निम्म्याहुन अधिक वाढ झालीये. तर भाजपने शिवसेनेला जोरदार टक्कर देत दुसरे स्थान पटकावले आहे. भाजपला मागील निवडणुकीत 8 जागा मिळाल्या होत्या.

यावेळी 19 जागांवर मुसंडी मारलीये. शिवसेनेनं 12 जागा मिळवत तिसऱ्या स्थानावर फेकली गेलीये. तर भिंवडीत राष्ट्रवादीला अंतर्गत मतभेदाचा फटका बसला. राष्ट्रवादीला इथं भोपळाही फोडता आला नाही. स्थानिक निवडणुकीत सतत पराभवाने खचलेल्या काँग्रेसला भिंवडीतला विजय नक्कीच दिलासादायक ठरणारा आहे.

भिंवडी महापालिकाचा निकाल

Loading...

एकूण जागा - 90

बहुमतासाठी आकडा - 46

काँग्रेस- 47

भाजप- 19

शिवसेना- 12

कोणार्क-४

समाजवादी-2

आरपीआय एकतावादी - ४

राष्ट्रवादी-0

अपक्ष 2

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2017 04:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...