मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

भिवंडीत बैल चोरणाऱ्या टोळीला जमावाकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, खूनाचा गुन्हा दाखल

भिवंडीत बैल चोरणाऱ्या टोळीला जमावाकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, खूनाचा गुन्हा दाखल

या मारहाणीत जखमी झालेल्या एका कसाईचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या एका कसाईचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या एका कसाईचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

रवी शिंदे, भिवंडी, 31 जानेवारी : भिवंडी तालुक्यातील भुईशेत येथील शेतकऱ्याच्या अंगणातून बैल चोरुन तो बोलेरो जीपमधून घेऊन जाणाऱ्या कसाईंच्या त्रिकुटाला जमावाने पकडून बेदम चोप दिला. या मारहाणीत जखमी झालेल्या एका कसाईचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना भिवंडी - पारोळ रोडवरील खडकी ब्रिजवर गुरुवारी मध्यरात्री घडली आहे.

नफीस कुरेशी ( 28, रा.कसाईवाडा ) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या कसाईचे नाव आहे. त्याने साथीदार आकिब जावेद आलम अंसारी ( 20, रा. गुलजार नगर ) आणि अमीर शकील खान ( 23, रा.ईदगाह रोड ) आदींच्या साथीने भुईशेत येथील शेतकरी प्रकाश नवश्या डोंबरे यांच्या अंगणात बांधून ठेवलेला बैल बोलेरो जीपमध्ये भरून तो चोरून नेण्याचा प्रयत्न केला.

सदर बैल चोरून घेऊन जात असल्याची कुणकूण आदिवासी पाड्यांवरील नागरिकांना मिळताच त्यांनी बोलेरो जीपचा पाठलाग करून खडकी ब्रिजवर अडवून जीपच्या काचा फोडून या तिघा कसाईंना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी जमावाने बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या नफीस कुरेशी यास उपचारासाठी काही नागरिकांनी स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या कसायाची प्रकृती खालावल्याने त्याला अधिक उपचारासाठी मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येऊन उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तिघा कसाईंच्या विरोधात तर नफीस अंसारी याच्या मृत्यूप्रकरणी जमावाच्या विरोधात खूनाचा गुन्हा, असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.     

First published:

Tags: Bhiwandi